Wedding bells: लवकरच 'या' सुपरस्टारसोबत लग्न करणार रश्मिका मंदाना? अफेअरच्या चर्चेने धरला जोर... By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 4:45 PM1 / 7साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तिच्या अल्लू अर्जुनसोबतच्या 'पुष्पा' सिनेमाला फारच यश मिळालं. रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणूनही ओळखली जाते. आता अशी चर्चा सुरू झाली आहे की, रश्मिका लवकरच लग्न करणार आहे. रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांची जोडी खूप लोकप्रिय आहे. नुकतेच दोघेही मुंबईत एकत्र दिसले होते. ज्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा सुरू झाली होती. आता दोघेही यावर्षी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. पण दोघांपैकी कुणीही याबाबत काही सांगितलेलं नाही.2 / 7विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना जोडी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सिनेमात एकत्र दिसले होते. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट झाले होते. दोघांची केमिस्ट्रीही पसंत केली गेली होती. त्यानंतर अनेकदा दोघे सोबत दिसले. तेव्हापासून चर्चा सुरू होती की, दोघांमध्ये अफेअर सुरू आहे. 3 / 7विजयच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर तो 'लायगर' सिनेमाचं शूट करत आहे. त्यासाठी तो मुंबईत आहे. तर रश्मिका तिच्या हिंदी सिनेमासाठी मुंबईत आहे. रश्मिकाने नुकतंच मुंबईत घर खरेदी केलं. दोघांनाही मुंबईत अनेकदा एकत्र बघण्यात आलंय. दोघे मागे गोवा ट्रिपलाही एकत्र गेले होते. रश्मिकाचे विजयच्या आईसोबतही खूप चांगलं पटतं. अशात दोघांच्या लग्नाची चर्चा जोर धरत आहे. आता हे खरं आहे की अफवा हे काही दिवसात कळेल.4 / 7२०१७ मध्ये रश्मिका मंदानाने रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. पण हा साखरपुडा फार काळ टिकला नाही. लग्नाच्या आधीच दोघांमध्ये काही वाद सुरू झाले होते. साखरपुडा मोडल्यावर रश्मिकाला खूप ट्रोलही करण्यात आलं होतं. यावर रश्मिका म्हणाली होती की, 'बऱ्याच दिवसांपासून मी माझ्याबाबत काही कहाण्या ऐकत आहे. या गोष्टींमुळे मला रोज त्रास होतो. मी इथे कुणालाही स्पष्टकरण द्यायला आले नाही. तुम्हाला माझी कंडीशन समजून घ्यावी लागेल. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात'.5 / 7प्रेमाबाबत काय म्हणाली रश्मिका? - प्रेमाबाबत प्रश्न विचारल्यावर अभिनेत्रीने सांगितलं की, प्रेमाला दोन शब्दात व्यक्त करणं फार अवघड आहे. कारण ही एक भावना आहे. माझ्यासाठी प्रेम ते आहे ज्यात दोघे एकमेकांना सन्मान देतात. एकमेकींसाठी वेळ देतात. प्रेम तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा ते दोन्हीकडून असतं. एकीकडून नाही.6 / 7लग्नाबाबत काय म्हणाली रश्मिका? - रश्मिकाला जेव्हा विचारलं की, ती लग्न कधी करणार तर ती म्हणाली की, मला अजून त्याबाबत माहीत नाही कारण मी त्याबाबत कधी काही विचार केला नाही. मला वाटतं की, मी लग्नासाठी अजून लहान आहे. आपल्या आवडीबाबत आणि पार्टनरबाबत ती म्हणाली की, आपला पार्टनर असा असावा, ज्याच्यासोबत तुम्हाला कन्फर्टेबल वाटेल.7 / 7आतापर्यंत रश्मिकाने साऊथमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण आता ती बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे. रश्मिका मंदाना आगामी बॉलिवूड सिनेमा 'मिशन मजनू' मध्ये काम करत आहे. ज्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. बॉलिवूडचे महानायक अभिनेता अमिताभ बच्चनसोबतही ती एका सिनेमात काम करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications