'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 6:00 AM1 / 9 इशा कोपीकर. जवळपास दहा वर्षे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत सहअभिनेत्री म्हणून काम केलं.2 / 9पहिल्याच चित्रपटात ह्रतिक रोशनसह तिला फिजा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.3 / 9अभिनयासोबतच तिने आयटम नंबरमधूनही रसिकांची मनं जिंकली. तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले खल्लास गाणं इतकं हिट ठरलं की रसिकांनी तिला खल्लास गर्ल असं नाव दिलं. 4 / 9यानंतर ‘प्यार, इश्क और मोहब्बत’, ‘आमदनी अठन्नी और खर्चा रूपया’, ‘ कंपनी, ‘ ‘काँटे’, ‘दिल का रिश्ता’, ‘कृष्णा कॉटेज’ ‘हॅलो’, ‘एक विवाह ऐसा भी’ अशा चित्रपटात ती झळकली. दक्षिणेकडील तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटातही भूमिका साकारल्या. मात आणि फ्रेंडशिप अनलिमिटेड या मराठी चित्रपटातही ती झळकली. 5 / 9इंदर कुमारसोबतच्या कथित रिलेशनशिपमुळेही ती चर्चेत राहिली होती. इंदर कुमारने याबाबत खुलासे केले होते. मात्र त्याच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांचं ब्रेकअप झालं.6 / 9यानंतर २००९साली ती हॉटेल व्यावसायिक रोहित उर्फ टिम्मी नारंगसह रेशीमगाठीत अडकली. 7 / 9मुंबईतील ‘लश रेस्टारंट’ आणि ‘द पॅलॅडियम’ हे त्याच्या मालकीचे आहेत. 8 / 9इशा आणि टिम्मीची ओळख अभिनेत्री प्रीती झिंटाने करून दिली होती. 9 / 9 इशा आपल्या कुटुंबासोबत सुखी आहे. त्यांच्या आयुष्यात ३ वर्षाची मुलगी रायना आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications