'लगान' सिनेमातली ही अभिनेत्री ब्रह्मकुमारी बनून जगतेय असं आयुष्य, आता दिसते अशी By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 6:00 AM1 / 11लगान चित्रपटात आपल्या सोज्वळ सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री ग्रेसी सिंगने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या चित्रपटात तिने गौरीची भूमिका साकारली होती. 2 / 11लगान, मुन्नाभाई एमबीबीएस आणि गंगाजल यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी ग्रेसी सिंग शेवटची टीव्ही मालिका संतोषी माँमध्ये दिसली होती. 3 / 11आज ग्रेसी सिंग बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय आहे. ग्रेसी सिंग उत्कृष्ट अभिनेत्रीसह उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे.4 / 11२० जुलै १९८० रोजी दिल्लीतील शीख कुटुंबात जन्मलेल्या ग्रेसी सिंगने शाळेपासूनच नृत्याला सुरुवात केली. 5 / 11९० च्या दशकाच्या मध्यात, ग्रेसी सिंग 'प्लॅनेट' नावाच्या नृत्य गटात सहभागी झाली आणि कला शाखेतून पदवी मिळवू लागली. या डान्स ग्रुपसोबत ग्रेसीला अनेक वेळा मुंबईत शोसाठी यावे लागले.6 / 11ग्रेसी सिंगने १९९७ मध्ये एका टीव्ही मालिकेसाठी ऑडिशन दिले आणि निवड झाली. या मालिकेचे नाव होते 'अमानत'. तिचा करिअरचा प्रवास या मालिकेपासून सुरू झाला आणि इतर काही मालिकांमध्येही सुरू राहिला.7 / 11२ वर्षांच्या आत, ग्रेसीच्या आयुष्यातही संधी आली आणि आशुतोष गोवारीकरने तिची लगान या चित्रपटासाठी निवड केली. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि ऑस्करसाठी नामांकन मिळालेला हा तिसरा चित्रपट ठरला.8 / 11लगानमध्ये ग्रेसीने आपल्या साधेपणाने आणि निरागस अभिनयाने लोकांची मने जिंकली. यानंतर ग्रेसीच्या करिअरला सुरुवात झाली.9 / 11त्यानंतर ग्रेसी सिंगने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ग्रेसी सिंग अरमान चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अनिल कपूरसोबत पडद्यावर दिसली होती. ग्रेसी सिंगने आतापर्यंत एकूण ३६ चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, काही हिट सिनेमानंतर ग्रेसीचे चित्रपट सतत फ्लॉप होऊ लागले. ग्रेसीनेही छोटा ब्रेक घेतला.10 / 11२०१३ मध्ये, ग्रेसी सिंग ब्रह्माकुमारी संस्थेत सामील झाली. आता ग्रेसी सिंग अभिनय आणि डान्स शो करत आहे. 11 / 11ग्रेसी शेवटची टीव्ही मालिका संतोषी मा २०२१ मध्ये दिसली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications