"प्रवास कुणासोबत घडतो तेच महत्वाचं ठरतं!", कुशल बद्रिकेची पत्नीसोबत कोकण सफर By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:43 AM1 / 8अभिनेता कुशल बद्रिके मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. 2 / 8बिझी शेड्युलमधून वेळ काढत कुशल बद्रिके पत्नी सुनयना सोबत कोकण सफारीला गेला आहे.3 / 8कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर गुहागरला फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत. यात त्याच्यासोबत त्याची पत्नीदेखील पाहायला मिळत आहे.4 / 8कुशल बद्रिकेने नुकतेच बोटीवरील फोटो शेअर करत लिहिले की, कधी कधी पोहोचायचं कुठे ? हे काही फार मॅटर करत नाही , प्रवास कुणा सोबत घडतो तेच महत्वाचं ठरतं !5 / 8कुशल बद्रिकेच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहते त्याच्या या व्हॅकेशनबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 6 / 8 चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून कुशलने सर्वांना खळखळून हसवलं. 7 / 8आता कुशल मॅडनेस मचाएंगे या हिंदी शोमध्ये झळकतोय. या शोमध्ये कुशलसोबत मराठमोळे कलाकार म्हणजेच अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता गौरव मोरे दिसत आहेत.8 / 8कुशल बद्रिकेच्या अभिनयाच्या प्रवासात कुटुंबाबरोबरच त्याच्या पत्नीचा म्हणजेच सुनयनाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications