"मी आईचं ऐकायला हवं होतं" श्रीदेवीच्या आठवणीत जान्हवी कपूरने व्यक्त केलं दु:ख By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 1:22 PM1 / 8बॉलिवूडची हवाहवाई श्रीदेवी (Sridevi) यांची चाहते आजही आठवण काढतात. श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूरने 'द आर्चीज' सिनेमातून नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर तिची मोठी बहीण जान्हवी कपूर सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.2 / 8जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) 2018 साली करण जोहरच्या 'धडक' सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. यामध्ये तिने ईशान खट्ट्ररसोबत स्क्रीन शेअर केली. दोघांचाही हा पहिलाच सिनेमा होता.3 / 8दुर्दैवाने लेकीचा डेब्यू पाहण्याआधीच श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांचं दुबईत निधन झालं तर जुलै 2018 मध्ये जान्हवीचा 'धडक' रिलीज झाला. त्यामुळे श्रीदेवी यांना लाडक्या लेकीचं पदार्पण पाहता आलं नाही.4 / 8आता जान्हवीने श्रीदेवी यांच्या जाण्यानंतर काय पश्चात्ताप होतो याचा खुलासा केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली,'धडक सिनेमाचं शूट सुरु असताना आईला माझ्यासोबत सेटवर यायचे होते. ती अनेकदा स्वत:हून सेटवर यायची. पण नंतर मी तिला सेटवर येण्यापासून थांबवायला लागले.'5 / 8'मला वाटायचं की मी सुपरस्टार श्रीदेवीची मुलगी असल्याचा फायदा घेत आहे असा लोकांचा समज होईल. तसंही धडक सिनेमा मला मी श्रीदेवीची मुलगी आहे म्हणूनच मिळाला असंच सगळ्यांना वाटत होतं. पण आता मला आईला सेटवर न येऊ दिल्याचा पश्चात्ताप होतोय.'6 / 8जान्हवी म्हणाली,'आता मला प्रश्न पडतो की का मी तेव्हा लोकांच्या बोलण्याला इतकं महत्व दिलं. मी श्रीदेवीची मुलगी आहे आणि यात मी काय करु शकते. ती भारतातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक होती.'7 / 8'मी तेव्हा तिला सेटवर येऊ द्यायला हवं होतं आणि तिच्याकडून अभिनयाचे धडे घ्यायला हवे होते. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला वाटतं की मी का आईचं म्हणणं ऐकलं नाही.'8 / 8शेवटी जान्हवी असंही म्हणाली की,'कधी कधी वाटतं आई फोन करु आणि सांगू की या सिनेमाचं शूट सुरु आहे प्लीज सेटवर ये.' जान्हवी नुकतीच 'बवाल' सिनेमात दिसली. यातील तिच्या भूमिकेचं कौतुक केलं गेलं. आता ती आगामी 'बडे मिया छोटे मिया' आणि 'देवारा' सिनेमात झळकणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications