Join us

IN PICS : EMI भरायचा तर क्यूट तर दिसावंच लागेल..., जान्हवी कपूर असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 11:04 AM

1 / 8
बोनी कपूर व श्रीदेवी यांची लाडकी लेक जान्हवी कपूर रिल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये पुरती वेगळी आहे. ऑनस्क्रीन ती लाजऱ्या-बुजऱ्या सामान्य मुलीच्या भूमिका साकारते. पण ऑफस्क्रीन तिचा ग्लॅम अवतार थक्क करतो.
2 / 8
जान्हवी सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इथे स्वत:चे बोल्ड, ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. रिव्हिलिंग ड्रेसमधील तिची एक एक अदा चाहत्यांना घायाळ करते.
3 / 8
इन्स्टाग्रामवर जान्हवी रोज नवे फोटो शेअर करते. कारण इथून तिला मोठी कमाई करते. होय, सोशल मीडिया पोस्टमधून जान्हवी बक्कळ पैसा कमावते. विश्वास बसणार नाही, पण याच पैशातून ती आपला ईएमआय भरते.
4 / 8
Galatta Plusला दिलेल्या मुलाखतीत खुद्द जान्हवीने हा खुलासा केला. ती म्हणाली, मी चित्रपटात एका मध्यमवर्गीय, सामान्य मुलीची भूमिका करते आणि सोशल मीडियावर मात्र बोल्ड, ग्लॅमरस दिसते, असं का? असा प्रश्न मला अनेकजण करतात. पण स्क्रिनवर मी दिसते ते माझं काम आहे आणि रिअलमध्ये दिसते ती मी आहे.
5 / 8
पुढे ती म्हणाली, माझी सोशल मीडिया लाईफ फारच मजेशीर आहे. मला मोठ मोठ्या ब्रँडच्या एंडॉर्समेंट्स मिळाव्यात,हा माझा प्रयत्न असतो. ज्यातून मी माझा ईएमआय भरते.
6 / 8
सोशल मीडिया हा माझ्यासाठी मजेदार पर्याय आहे. मी क्यूट दिसले तरच पाच-दहा आणखी लोक माझे फोटो बघतील. ब्रँड मला अ‍ॅप्रोच करतील आणि मी जास्ती जास्त कमाई करेल आणि यातून मी सहजपणे ईएमआय भरू शकेल, असं तिने सांगितलं.
7 / 8
जास्तीत जास्त रिअल राहण्याचा माझा प्रयत्न असतो. मी रिअल लाईफमध्ये जशी आहे, तशीच राहण्याचा प्रयत्न करते. रिल लाईफमध्ये मात्र वाट्याला आलेल्या भूमिका प्रामाणिकपणे करण्याचा माझा प्रयत्न असतो, असंही ती म्हणाली.
8 / 8
जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, गेल्या 4 नोव्हेंबरला तिचा ‘मिली’ हा सिनेमा रिलीज झाला. अर्थात जान्हवीच्या या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ओपनिंग वीकेंडमध्ये या चित्रपटाने केवळ 2 कोटींची कमाई केली.
टॅग्स :जान्हवी कपूरबॉलिवूडइन्स्टाग्रामसोशल मीडिया