Join us

आईच्या निधनाचा फोन आल्यावर...; श्रीदेवीच्या मृत्यूबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी, म्हणाली - खुशीच्या रुममधून रडण्याचा आवाज ऐकून...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 6:50 PM

1 / 8
जान्हवी कपूर आणि खुशी कपूरने आई श्रीदेवीच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाची वाट धरली. जान्हवी बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर खुशीने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
2 / 8
२०१८ साली अचानक श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. यातून त्यांच्या कुटुंबीयांनाही सावरणं कठीण होतं.
3 / 8
कॉफी विथ करणमध्ये जान्हवीने श्रीदेवीच्या मृत्यूबाबत भाष्य केलं. ती म्हणाली, 'खुशी खूप धीट आहे. छोटी बहीण असूनही खुशीने आई गेल्यानंतर मला सांभाळलं.'
4 / 8
आईच्या आठवणीत जान्हवी आणि खुशी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
5 / 8
पुढे ती म्हणाली, 'जेव्हा मला आईच्या निधनाची बातमी समजली तेव्ही मी माझ्या रुममध्ये होते.'
6 / 8
'मला खुशीच्या रुममधून रडण्याचा आवाज येत होता. मी तिच्या रुममध्ये जाऊन तिला पकडून रडेन, असं मला वाटलं होतं.'
7 / 8
'पण, जेव्हा तिने मला पाहिलं. तिने तिचं रडणं थांबवलं. तेव्हापासून मी तिला रडताना पाहिलेलं नाही.'
8 / 8
पुढे खुशी म्हणाली, 'आई नसेल हे स्वीकारायला मला थोडा वेळ लागला. पण, माझ्याकडे बाबा आणि जान्हवी होते. त्यांनी मला मदत केली.'
टॅग्स :जान्हवी कपूरश्रीदेवीखुशी कपूर