Join us

जान्हवी कपूरचं लवकरच शुभमंगल सावधान! अभिनेत्रीनं स्वत:च सांगितला वेडिंग प्लान, तिरुपतीत लग्न अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 4:52 PM

1 / 10
जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला होता. आज तिने बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेतून तिने रसिकांच्या मनात घर केले आहे.
2 / 10
आता अभिनेत्री जान्हवी लग्नासाठी तयार आहे. तिच्या पात्रांप्रमाणेच, अभिनेत्रीने तिच्या लग्नाचाही खूप विचार केला आहे. जाणून घेऊया कसा असेल जान्हवीच्या स्वप्नांचा राजकुमार.
3 / 10
जान्हवी कपूर तिच्या प्रोफेशन लाईफबरोबरच तिच्या खासगी लाईफमुळेही चर्चेत असते.
4 / 10
जान्हवीचं नाव माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाबरोबर जोडण्यात आलं आहे. ती शिखर पाहाडियाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
5 / 10
जान्हवी आता लग्नासाठी तयार झाली आहे, याबाबत तिने स्वत:च खुलासा केला आहे.
6 / 10
ब्राइड्स टुडे मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने लग्नाबद्दल सांगितले. ती म्हणाली, मला माझं लग्न तिरूपतीला करायचं आहे.
7 / 10
तिरूपतीमध्ये मेहंदी आणि संगीत सोहळ्यासाठी मला मलयापुर हे लोकेशन प्रचंड आवडतं.
8 / 10
जान्हवीला दोन दिवसात तिचे लग्न उरकायचे आहे. ती म्हणते, २ दिवसात लग्न करायचं आहे आणि लग्नानंतर रिसेप्शन ठेवायची मला गरज वाटत नाही.
9 / 10
जान्हवीला लग्न साधेपणाने करायचे आहे. जान्हवी म्हणाली, मला लग्नात मोठं डेकोरेशन करायचं नाही. फक्त मोगरा आणि मेणबत्त्यांनी सजलेल्या बोहल्यावर मला नवरी म्हणून चढायचं आहे.
10 / 10
जान्हवी कपूर म्हणाली, लग्नात मला डिझाइनर लेहंगा नको. मला कांजीवरम किंवा पट्टू पावडाई साडी नेसण्याची इच्छा आहे.
टॅग्स :जान्हवी कपूर