९ पेग अन् मग ९ मिनिटांत लिहिलं गाणं... जावेद अख्तर यांच्या 'या' लोकप्रिय गाण्यामागची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:58 IST
1 / 7जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय गीतकार आणि पटकथालेखक. 'शोले', 'दीवार', 'जंजीर' यांसारख्या लोकप्रिय सिनेमांचं लेखन जावेद यांनी सलीम खान यांच्यासोबत केलं2 / 7जावेद अख्तर यांची केवळ पटकथाकार म्हणून ओळख नाही. तर गीतकार म्हणूनही त्यांना आदराचं स्थान आहे. 3 / 7जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत त्यांनी ९ पेग मारुन एक लोकप्रिय गाणं कोणतं लिहिलं होतं त्याचा किस्सा सांगितला होता.4 / 7हे गाणं होतं 'साथ साथ' सिनेमातील 'तुमको देखा तो ये खयाल आया'. या सिनेमाचे दिग्दर्शक रमन कुमार यांनी जावेद अख्तर यांना सिनेमासाठी गाणं लिहिण्याची विनंती केली होती.5 / 7रमन कुमार यांनी जावेद साबना या गाण्यासाठी पैसे मिळणार नाहीत असं आधीच सांगितलं होतं. त्यामुळे जावेद साब लिखाणासाठी टाळाटाळ करायचे.6 / 7एकदा मात्र रमन कुमार त्यांच्या घरी आले. त्यावेळी जावेद साब खाण्या-पिण्याचे शौकीन होते. त्यांनी ८ - ९ पेग रिचवले होते.7 / 7अखेर रमन कुमार यांच्या समोरच केवळ ९ मिनिटात जावेद अख्तर यांनी गाणं लिहिलं. हे गाणं पुढे जगजीत सिंग यांनी गायलं. आज 'तुमको देखा तो ये खयाल आया' हे गाणं अनेकांचं फेव्हरेट आहे.