Join us

"असं जगलं पाहिजे! आम्ही तुम्हाला खूप मिस करू"; समीर चौघुलेची 'अण्णां'साठी भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:07 AM

1 / 6
Sameer Chougule on Jayant Sawarkar: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेमळ चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Sawarkar passes away) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांना प्रेमाने व आपुलकीने इतर कलाकार मंडळी 'अण्णा' नावाने हाक मारायचे.
2 / 6
मुंबईतील रुग्णालयात सावरकर यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु होते. रविवारी रात्री त्यांना वेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. दुर्दैवाने सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक नाटके आणि सिनेमे करणारा एक तारा निखळल्याने सिनेसृष्टी हळहळली.
3 / 6
जयंत सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनंतर, अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच त्यांच्या विषयीच्या आठवणीही सांगितल्या. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले यानेही अण्णांविषयी एक भन्नाट किस्सा सांगितला.
4 / 6
समीर चौघुले याने पोस्टमध्ये लिहिले, 'दिग्गज रंगकर्मी नटश्रेष्ठ अण्णा सावरकर गेले... तरुणांना ही लाजवेल अशी एनर्जी असणारा सच्चा रंगकर्मी गेला....नागपूरच्या नाट्य संमेलनात आम्ही दोघे रूम पार्टनर होतो....'समीर तू बिनधास्त रात्री उशिरा पर्यंत टिव्ही बघ हं....मला झोपेचा काहीच प्रॉब्लेम नाही.. मला कुठे ही झोप लागते.'
5 / 6
'अण्णा असे म्हणाले आणि निमिषार्धात आमच्या वयातील दरी नाहीशी करून कोणत्याही पिढीशी जुळवून घेणारे अण्णा त्या क्षणी प्रेमात पाडून गेले.... सतत दुसऱ्याचं कौतुक करण्याचा स्वभाव आणि त्यांच्या संगमरवरी कारकिर्दीचे किस्से यात पहाट कधी झाली हेच कळलं नाही... मी सतत सांगतोय 'अण्णा तुम्ही झोपा..पण छे हा तरुण ऐकतोय कसला!'
6 / 6
'साधारणतः मैफल काही लोकांची असते.. पण त्या रात्री मात्र रसिक फक्त 'मी' होतो हे माझे भाग्य.... असे हे आमचे दोस्त अण्णा..... तुमच्या सारखं आयुष्यभर कलेला सावलीप्रमाणे घेऊन जगता आलं पाहिजे हो... अण्णा... आम्ही तुम्हाला खूप मिस करू... जिथे असाल तिथे मस्तच असाल..' अशी अतिशय भावनिक पोस्ट लिहून समीर चौघुलेने अण्णांना शाब्दिक आदरांजली वाहिली.
टॅग्स :मराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्राइन्स्टाग्राम