Join us

PHOTOS: अन् जिया खान कायमची ‘नि:शब्द’ झाली; ‘त्या’ रात्री घडले होते असे काही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 2:16 PM

1 / 16
बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने सन 2013 मध्ये आजच्याच दिवशी (3 जून) आत्महत्या करून आयुष्य संपवले होते. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणा-या जियाच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही.
2 / 16
तिच्या आत्महत्या प्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेन्ड सूरज पंचोलीला अटक करण्यात आली होती. जिया खान प्रकरणाचा खटला अजूनही सुरू आहे.
3 / 16
2007 साली ‘नि:शब्द’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी जिया काम मिळत नसल्यामुळे ती नैराश्येने ग्रस्त होती. अखेर तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, असे काही जणांचे म्हणणे आहे.
4 / 16
काहींच्या मते, बॉयफ्रेंडसोबत निर्माण झालेल्या दुराव्यामुळे तने आत्महत्या केली. जियाची आई राबिया खान यांचे मते, जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. अद्याप तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
5 / 16
20 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्कमध्ये जियाचा जन्म झाला. पण तिचे बालपण लंडनमध्ये गेले. तिचे खरे नाव नफीसा खान आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने तिचे नाव जिया खान असे ठेवले.
6 / 16
जिया खान पूर्वाश्रमीची अभिनेत्री राबिया आमीन यांची मुलगी आहे. राबियाने अनेक चित्रपटात काम केले होते. जियाने उर्मिला मातोंडकरचा ‘रंगीला’ हा सिनेमा पाहून अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ती केवळ सहा वर्षांची होती.
7 / 16
‘दिल से’ या चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. यात जियाने मनीषा कोईरालाच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
8 / 16
16 वर्षांच्या जिया मुकेश भट्टची ‘तुमसा नहीं देखा’साठी पहिली चॉईस होती. जियाने हा चित्रपट साईनही केला. पण नंतर ती या चित्रपटातून बाहेर पडली होती. याचे कारण म्हणजे, वयाच्या हिशेबाने जियाला ही भूमिका अतिशय मोठी वाटली होती.
9 / 16
जियाच्या मृत्यूच्या तासभर आधी सूरजने तिला 10 मेसेज पाठवले होते. ज्यात अतिशय वाईट भाषा आणि शिव्यांचा वापर करण्यात आला होता. आरोपपत्रानुसार, आत्महत्येच्या दिवशी जिया सूरजला सतत फोन करत होती. पण रात्री 10 वाजून 22 मिनिटांपर्यंत सूरजने तिच्या एकाही कॉलचे उत्तर दिले नाही त्यामुळे ती त्याच्या घरी गेली होती. तिने सूरजच्या नोकराकडे त्याची चौकशी केली. त्यावर सूरजचा फोन आॅफ असून तो आपल्या वडीलांसोबत मिटिंगमध्ये असल्याचे त्याच्या नोकराने तिला सांगितले. त्यानंतर जिया काही काळ त्याच्या घराबहेर थांबली आणि मग तिथून निघून गेली.
10 / 16
सूरजने जियाला बोलवण्यासाठी एका माणसाला पाठवले. पण तोपर्यंत जिया तिथून निघून आपल्या घरी गेली होती.
11 / 16
सूरजने तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने फोन उचलला नाही. यानंतर सूरजने तिला 10 मेसेज केले. ज्यातील भाषा अतिशय वाईट होती आणि यात शिव्यांचाही वापर करण्यात आला होता.
12 / 16
सूरजने केलेल्या या सर्व मेसेज नंतर बरोबर तासाभराने जियाने आत्महत्या केली.
13 / 16
जिया एक ओपेरा सिंगर होती. 16 व्या वर्षांत तिने 6 पॉप ट्रॅक रेकॉर्ड केले होते.
14 / 16
जियाच्या आईने सूरजवर बरेच आरोप केले होते, परंतु सूरजने नेहमीच निर्दोष असल्याचा दावा केला.
15 / 16
जिया खानने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे आजही रहस्यमय आहे परंतु बॉलिवूडने कायमचा चमकणारा तारा गमावला आहे.
16 / 16
जिया खानने 3 जून 2013 रोजी आत्महत्या केली. पण जिया खान सुसाइड नोट लिहून गेली होती. सुसाईड नोटमध्ये जिया खानने लिहिले होते की, ‘ मी तुझ्यावर खूप प्रेम केले तरीही तू रोज माझा टॉर्चर केलस.’
टॅग्स :सुरज पांचोलीबॉलिवूड