"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 4:54 PM1 / 11जिज्ञासा सिंह ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. 'थपकी प्यार की' या मालिकेतून तिला घराघरात ओळख मिळाली.2 / 11'थपकी प्यार की' या शोच्या दुसऱ्या सीझनमध्येही ही अभिनेत्री दिसली होती. पण तब्येतीच्या कारणामुळे तिने २०२२ मध्येच शो सोडला.3 / 11त्यानंतर ही अभिनेत्री कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. अशा परिस्थितीत तिने इंडस्ट्री सोडल्याचं अनेकांना वाटत आहे.4 / 11आता खुद्द जिज्ञासानेच याबाबत खुलासा केला आहे. ETimes शी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, 'मी २०१३ पासून सतत काम करत आहे.'5 / 11'अशा स्थितीत भावनिक आणि शारीरिक चढ-उतार होणं स्वाभाविक आहे. माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून मी स्वतःला खूप पूश केलं, त्यामुळे माझी तब्येत आणखी बिघडली.'6 / 11'मला 'थपकी 2' मधून माघार घ्यावी लागली. मला ते पात्र खूप आवडलं. हा माझा चॉईस नव्हता, पण माझ्या तब्येतीसाठी मला ते करावं लागलं.'7 / 11'कामावर परत येण्यापूर्वी मला बरं होण्यासाठी वेळ हवा होता. कामातून ब्रेक घेणं हा योग्य निर्णय होता. पण इतका वेळ लागेल असं मला वाटलं नव्हतं.'8 / 11'आता मी जिथे जिथे ऑडिशनसाठी जाते तिथे लोक मला विचारतात की मी वेब शोसाठी टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे का? जे खरं नाही.'9 / 11'मी हे स्पष्ट करू इच्छिते की, मी टीव्ही इंडस्ट्री सोडलेली नाही. मी आता पूर्णपणे ठीक आहे आणि मला लवकरच टीव्हीवर परतायचं आहे.'10 / 11'टीव्ही इंडस्ट्रीने मला खूप काही दिले आहे. मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे' असं देखील अभिनेत्रीने म्हटलं आहे. 11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications