Join us

OMG!! जॉन अब्राहमने रेस्टॉरंटमध्ये एकाचवेळी खाल्ल्या होत्या 64 चपात्या, पाहून वेटर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 6:04 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा बॉलिवूडच्या सर्वाधिक फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. फिटनेसच्या बाबतीत तो जराही तडतोड करत नाही. पण आधी असं नव्हतं.
2 / 6
होय, आधी जॉनला खाण्यापिण्याची प्रचंड आवड होती. एकदा काय तर या पठ्ठ्यानं रेस्टॉरंटमध्ये 64 चपात्या खाल्ल्या होत्या. जॉनने ‘द कपिल शर्मा शो’ शोमध्ये हा खुलासा केला होता.
3 / 6
‘द कपिल शर्मा शो’मध्ये जॉन त्याच्या ‘अटॅक’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही सुद्धा त्याच्यासोबत हजर होती.
4 / 6
जॉन व रकुल यांनी शोमध्ये धम्माल मज्जा केली. याचवेळी जॉनने 64 चपात्यांचा किस्साही सांगितला. तू एकदा रेस्टॉरंटमध्ये ६४ चपात्या खाल्ल्या होत्या ही अफवा खरी आहे का? असं कपिलने जॉनला विचारलं.
5 / 6
यावर हो, हो, हे खरं आहे आणि मी एकाचवेळी 64 चपात्या खाल्ल्या होत्या आणि हे पाहून वेटर हैराण झाला होता. अजून भात सुद्धा आहे, असं वेटर मला म्हणाला होता.
6 / 6
आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. जॉन फिटनेससाठी स्ट्रीक डाएट फॉलो करतो. काजू कतली ही मिठाई जॉनला प्रचंड आवडते. पण गेल्या 27 वर्षांपासून जॉनने काजू कतली खाल्लेली नाही.
टॅग्स :जॉन अब्राहमबॉलिवूड