बायकोसोबत जॉन अब्राहमचा ब्रेकफास्ट पाहून नेटकर्यांना आवरले नाही हसू; वाचा, काय आहे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 6:04 PM1 / 9जॉन अब्राहम (john abraham ) बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. जॉन आपल्या रिल लाईफबद्दल भरभरून बोलतो. पण आपल्या रिअल लाईफबद्दल बोलणे मात्र त्याला अजिबात आवडत नाही. त्याची पत्नी प्रिया ही सुद्धा लाईमलाईटपासून दूर राहते.2 / 9सध्या मात्र जॉन व त्याची पत्नी प्रिया रूंचालचा एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत प्रिया व जॉन सकाळची न्याहारी करताना दिसत आहेत.सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा फोटो शेअर केला आहे. जॉन व प्रियाच्या ब्रेकफास्टमध्ये काय तर ग्रीन सॅलड.3 / 9आता फिटनेस फ्रिक सेलिब्रिटींसाठी ग्रीन सॅलॅड म्हणजे, आवडता नाश्ता. पण सामान्य माणसांना तो कसा पचणार? नेमक्या याचवरून अनेक युजर्सनी जॉन व प्रिया ट्रोल केले.4 / 9प्लेटमध्ये हे काय बकरीचे खाद्य ठेवलेय? असा प्रश्न एका युजरने या फोटोवर कमेंट करत विचारला.5 / 9जॉन आणि प्रिया 2014 मध्ये विवाह बंधनात अडकले.6 / 9प्रियाचा जन्म अमेरिकेत झाला असून, ती एक इन्व्हेस्टमेंट बॅँकर आहे.7 / 9 प्रियासोबत लग्न करण्याअगोदर जॉनचे अभिनेत्री बिपाशा बसू हिच्याशी अफेयर होते. दोघे लग्न करतील असे सगळ्यांना वाटत होते. परंतु काही कारणास्तव त्यांच्यात ब्रेकअप झाले. 8 / 9जॉनची पत्नी प्रिया ही अतिशय प्रायव्हेट पर्सन आहे. अगदी जॉनपेक्षाही प्रायव्हेट. तिची हीच गोष्ट जॉनला सर्वाधिक आवडते.9 / 9प्रिया इन्व्हेस्टमेंट बँकर आहे़ सोबत जॉनच्या फुटबॉल टीमचे कामही ती हाताळते. आणखी वाचा Subscribe to Notifications