Join us

खडतर आयुष्य ते कोट्यवधींचा मालक; एकेकाळी १०० रुपये कमावणाऱ्या Johnny Lever चं Net worth पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 11:53 AM

1 / 11
जॉनी लिव्हर हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. आपल्या विनोदी अभिनय शैलीमुळे जॉनी लिव्हर यांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
2 / 11
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याने वयाच्या ६५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
3 / 11
जवळपास ८० च्या दशकात कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या जॉनी लिव्हर यांनी एक एक पैशासाठी मोठा संघर्ष केला आहे.
4 / 11
करिअरच्या सुरुवातीला स्ट्रगल करणाऱ्या जॉनी लिव्हर यांनी एकेकाळी १०० रुपयांवर घर चालवलं आहे.
5 / 11
संघर्ष आणि मेहनत यांच्या जोरावर जॉनी लिव्हर यांनी आज कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
6 / 11
१०० रुपयांपासून कमाईची सुरुवात करणारे जॉनी लिव्हर आज कोट्यधीश असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याचं एकूण नेटवर्थ किती ते पाहुयात.
7 / 11
३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करणारे जॉनी लिव्हर एका चित्रपटासाठी लाखो रुपये मानधन घेतात.
8 / 11
caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, जॉनी लिव्हर प्रत्येक महिन्याला साधारणपणे १ कोटी रुपयांची कमाई करतात. त्यामुळे वर्षाकाठी ते १२ कोटींच्या आसपास कमाई करतात.
9 / 11
जॉनी लिव्हर हे मुंबईतील लोखंडवाला येथे 3BHK अपार्टमेंटमध्ये राहतात. तसंच मुंबईमध्ये त्यांचे काही फ्लॅट्स, आणि एक व्हिलादेखील आहे.
10 / 11
त्यांच्याकडे ऑडी क्यू7, होंडा अकॉर्ड, टोयोटा फॉर्च्युनर सारखी महागडी वाहने आहेत.
11 / 11
जॉनी लिव्हर यांची एकूण संपत्ती 227 कोटी रुपये इतकी आहे. त्यांचा कमाईचा स्त्रोत म्हणजे चित्रपटातील काम, स्टेज शो आहे.
टॅग्स :जॉनी लिव्हरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा