धारावीच्या झोपडीत राहिले, गरीबीमुळे अर्धवट शिक्षण अन् दिवसाला कमवायचे ५ रुपये, असा होता अभिनेत्याचा खडतर प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:45 PM1 / 10कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर जॉनी लिव्हर आजही रसिकांचे मनोरंजन करतात. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी ते डगमगले नाहीत. अन् अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे आजही साऱ्यांच्या मनजावर राज्य करतायेत. 2 / 10जेव्हा जेव्हा कॉमेडीचा विषय निघतो तेव्हा डोळ्यासमोर सर्वात आधी फक्त आणि फक्त जॉनी लिव्हरचा चेहरा डोळ्यासमोर येतो. स्टँडअप कॉमेडीला खरी ओळख जॉनी लिव्हर यांनीच मिळवून दिली आहे.3 / 10 जॉनीने गेल्या काही वर्षांत प्रसिद्धी, पैसा मोठ्या प्रमाणावर मिळवला आहे. जॉनी यांचं सगळे बालपण झोपडपट्टीत गेले. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या त्या खास गोष्टी ज्या फार कमी चाहत्यांना माहिती असतील.4 / 10जॉनी लिव्हर आज बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध कॉमेडीयन मानले जातात. जॉनी लिव्हर आज एक यशस्वी विनोदी अभिनेते असला तरी त्याने हे यश मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला आहे.5 / 10 जॉनी लिव्हरची परिस्थिती अतिशय बेताची होती. ते धारावीतील एका छोट्याशा झोपडीमध्ये राहात होते. त्यांना नृत्याची आवड असल्याने ते त्यांच्या परिसरात होणाऱ्या अनेक समारंभात भाग घ्यायचा. त्यांच्या अंगात कला होती. पण त्यांना वाव मिळत नव्हता. 6 / 10एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, ''मी माझ्या घरातील सगळ्यात मोठा मुलगा होतो. माझ्या घरची परिस्थिती चांगली नसल्याने मला सातवीतच शाळा सोडावी लागली.''7 / 10 ''माझ्या वडिलांची कमाई खूप कमी असल्याने मी १२व्या वर्षापासून नोकरी करायला सुरुवात केली. मी सहा वर्षं एका कंपनीत काम केले. तिथे मला खूपच कमी पैसे मिळायचे. पण कुटुंबाला हातभार लागतोय असा विचार करून मी हे काम करत होतो.. ''8 / 10घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे जॉनी यांनी लहान वयातच काम करायला सुरुवात केली होती. रस्त्यावर पेनही त्यांनी विकले. या कामातून दिवसाला फक्त त्यांना पाच रुपये मिळायचे. संजीव कुमार, प्राण, अशोक कुमार, यासारखे दिग्गज कलाकार मंडळीदेखील त्यांची मिमिक्री पाहून पेन खरेदी करायचे. नंतर त्यांनी हिंदुस्तान लिव्हर कंपनीत नोकरी केली.9 / 10कल्याणजी आनंदजी ह्यांच्या म्युजीकल शोमध्ये परफॉर्म करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. स्टेज शो ते रुपेरी पडदा त्यांनी गाजवला.10 / 10 १३ फिल्मफेअर अवॉर्ड त्यांनी मिळवले आहेत. caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, जॉनी लिव्हर प्रत्येक महिन्याला साधारणपणे १ कोटी रुपयांची कमाई करतात. त्यामुळे वर्षाकाठी ते १२ कोटींच्या आसपास कमाई करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications