काजल अग्रवालनं दिली गुड न्यूज, पती गौतमने शेअर केली हटके पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 11:11 IST
1 / 8साऊथ सुपरस्टार काजल अग्रवाल प्रेग्नेंट असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. अखेर या चर्चा ख-या ठरल्या आहेत. काजल व तिचा पती गौतम किचलू यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.2 / 8गौतमने काजलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात दोघांनी रोमॅन्टिक पोझ दिली आहे. फोटोत काजल बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय.3 / 8‘2022 तुझी वाट पाहत आहे,’असं कॅप्शन गौतमने या फोटोला दिलं आहे. शिवाय सोबत गर्भवती महिलेचा इमोजीही शेअर केला आहे.4 / 8गौतमच्या या पोस्टनंतर काजल प्रेग्नंट असल्याचं स्पष्ट झालं आहे. दोघांनाही चाहते शुभेच्छा देत आहेत.5 / 8काजल आणि गौतम यांनी 30 ऑक्टोबर 2020 रोजी लग्न केले. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.6 / 8 काजल आणि गौतम जवळपास 7 वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ती पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना दिसते.7 / 8काजलचा नवरा गौतम किचलूचा इंटीरिअरचा व्यवसाय आहे. दस-याच्या मुहूर्तावर गौतम किचलूशी आपण लग्न करत असल्याची बातमी काजलने आपल्या चाहत्यांना दिली होती.8 / 8काजल अग्रवालने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे.अजय देवगणसोबत सिंघम या चित्रपटामध्येही ती दिसली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत स्पेशल 26 सिनेमातही तिने काम केले.