पाहा, काजल अग्रवालच्या शाही लग्नाचे फोटो आणि काही रोमॅन्टिक क्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 11:15 IST
1 / 10अभिनेत्री काजल अग्रवाल 30 ऑक्टोबरला लग्नाच्या बेडीत अडकली. मित्र गौतम गौतम किचलूसोबत तिने लग्नगाठ बांधली.2 / 10 कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजके पाहुणे या लग्नाला हजर होते.3 / 10काजल आणि गौतमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र लग्नानंतर आता काजलनं स्वत: आपल्या सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 4 / 10या शाही लग्नाचा थाट काही औरच होता. लग्नात काजल जितकी सुंदर दिसत होती. तितकाच तिचा पती गौतमही अगदी रुबाबदार दिसत होता. 5 / 10दस-याच्या मुहूर्तावर गौतम किचलूशी आपण लग्न करत असल्याची बातमी काजलने आपल्या चाहत्यांना दिली होती. 6 / 10काजलचा नवरा गौतम किचलूचा इंटीरिअरचा व्यवसाय आहे. 7 / 10काजलने शेअर केलेला हा फोटो सर्वात बेस्ट आहे. जो त्यांच्या लग्नातील एक रोमँटिक क्षण आहे. या फोटोत काजल गौतमच्या हाताचे चुंबन घेताना दिसते आहे. दोघांच्याही चेह-यावर आनंद दिसतो आहे. 8 / 10दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहेत आणि एकमेकांच्या डोक्यावर हात ठेवला आहे. 9 / 10 मी आता मिसची मिसेस झाली आहे. माझा बेस्ट फ्रेंड आणि सोलमेटशी मी लग्न केले आहे. गौतम मी खूप आनंदी आहे कारण तुझ्यात मला सर्वकाही मिळाले, असे काजलने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे. 10 / 10काजल अग्रवालने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे. अजय देवगणसोबत सिंघम या चित्रपटामध्येही ती दिसली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत स्पेशल 26 सिनेमातही तिने काम केले.