Kajol : ‘मला पगार हवा होता...’; काजोलला कधीच बनायचं नव्हतं अभिनेत्री, वाचा काय म्हणाली... By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 2:03 PM1 / 8कधी सिमरन, कधी अंजली बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री काजोल हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आजही काजोलची क्रेझ कायम आहे. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं. पण या काजोलला कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं.2 / 8होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण काजोलनं कधीच अभिनेत्री बनण्याचं स्वप्न बघितलं नव्हतं. आयुष्यात तिला काही वेगळं करायचं होतं. अलीकडे ‘कोण होणार करोडपती’ या मराठी रिअॅलिटी शोच्या सेटवर काजोलनं खुद्द हा खुलासा केला.3 / 8सचिन खेडेकर होस्ट करत असलेल्या या शोमध्ये नुकतीच काजोल व तिची आई तनुजा यांनी स्पेशल गेस्ट म्हणून हजेरी लावली. या शोमध्ये काजोलनं आयुष्याबद्दलचे अनेक शॉकिंग खुलासे केलेत.4 / 8मला कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं. मला कधीच बॉलिवूडचा भाग बनायचं नव्हतं, असं काजोल यावेळी म्हणाली आणि तिच्या डाय हार्ट फॅन्सला देखील क्षणभर धक्का बसला.5 / 8मला कधीच बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाग बनायची इच्छा नव्हती. मला अभिनेत्री बनण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. मला नोकरी करायची होती. दर महिन्याला पगाराचा चेक मला हवा होता. प्रत्येक महिन्याला हा पगाराचा चेक माझ्या अकाऊंटमध्ये जमा झाला असता आणि मी सुखात जगले असते, असं काजोल यावेळी म्हणाली.6 / 82019 साली पीटीआयला दिलेल्या मुलाखतीतही काजोल असं काही बोलली होती. मी बाय चान्स अभिनेत्री बनले. माझी सुरूवात फार काही चांगली नव्हती. अभिनयात करिअर करेल, असं मी कधीच ठरवलं नव्हतं. फक्त घडतं गेलं आणि पुढे मी आहे ते स्वीकारलं, असं ती म्हणाली होती..7 / 8काजोलने 1992 साली ‘बेखुदी’ या चित्रपटापासून करिअरला सुरूवात केली. पहिला चित्रपट फार काही चालला नाही. पण त्यानंतर आलेल्या बाजीगर, ये दिल्लगी, करण अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम अशा चित्रपटांनी काजोलला अपार यश मिळवून दिलं.8 / 8गेल्यावर्षी काजोल ‘त्रिभंगा’ या सिनेमात झळकली होती. सध्या ती ‘सलाम वेन्की’ या अपकमिंग प्रोजेक्टवर काम करतेय. गेल्यावर्षी काजोलने या चित्रपटाची घोषणा केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications