Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 11:10 AM1 / 9बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीनने अनुराग कश्यपच्या 'देव डी' चित्रपटातून डेब्यू केला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला चाहत्यांनी भरभरून दाद दिली.2 / 9आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करून आणि प्रसिद्ध होऊनही, कल्कीला तिच्या पहिल्या चित्रपटानंतर जवळपास दोन वर्षे कोणतंही काम मिळालं नाही.3 / 9आता तिच्या नवीन मुलाखतीत कल्कीने तिच्या प्रोफेशनल लाईफमधील कठीण टप्प्याबद्दल सांगितलं. तिने पैशासाठी अनेक प्रकारच्या भूमिका केल्याचा खुलासाही अभिनेत्रीने केला.4 / 9कल्की म्हणाली, 'देव डी' नंतर मला दोन वर्ष दुसरा कोणताच चित्रपट मिळाला नाही. मला वाटतं यानंतरचा माझा पुढचा चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' होता.5 / 9या काळात कल्कीला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला. पैशाअभावी वडापाव खाऊनच दिवस काढल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. ती लोकल ट्रेनने प्रवास करायची.6 / 9यशाबद्दल लोकांच्या समजुतीबद्दल बोलताना कल्की म्हणाली की, लोकल ट्रेनमध्ये तिला पाहून लोक खूप आश्चर्यचकित व्हायचे. लोक तिला विचारायचे की तिच्याकडे बॉडीगार्ड का नाही?7 / 9कल्कीनेही आपण पैशासाठी वेगळ्या भूमिका केल्याचं मान्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली- मी पैशासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत.8 / 9कल्की 'खो गये हम कहाँ' मध्ये दिसली होती. ती सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचे अनेक चाहते आहेत. 9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications