By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:05 IST
1 / 14टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबीने काल 10 फेबु्रवारीला बॉयफ्रेन्ड शलभ डांगसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.2 / 14सात फेरे घेत तिने आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये काम्याच पंजाबीचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले होते. तर दुसरीकडे शलभने देखील क्रीम आणि गोल्डन शेरवानी परिधान केली होती. 3 / 14लग्नाधीच काम्याने तिच्या प्री-वेडींग सेलिब्रेशनचे सगळी धम्माल मस्ती करणारे फोटो चाहत्यांसह शेअर केले होते.4 / 14फोटोंना रसिकांकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळाले. लग्नाचे फोटो पाहून चांहत्यांनी त्यांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 5 / 14गतवर्षी 10 फेबु्रवारी या तारखेलाच काम्या व शलभ डांग यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले. वर्षभरानंतर याच तारखेला काम्या व शलभ लग्नाच्या आणाभाका घेतल्या. 6 / 14शलभ डांग दिल्लीत राहणारा असून तो हेल्थकेअर बिझनेसमन आहे.7 / 14 हळद सेरेमनीदरम्यान काम्या पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. मित्रांनी आणि कुटुंबीयांनी तिला हळद लावली8 / 14 हळदीच्या कार्यक्रमात काम्याचा आनंद ओसंडून वाहत होता.9 / 14काम्याने हळद चांगलीच एन्जॉय केली.10 / 14 मेहंदी सेरेमनीत काम्याने ब्लू कलरचा लहंगा घातला होता. 11 / 14दोन्ही हातांवर मेहंदी सजलेली दिसली. 12 / 14 बॅचलर पार्टीचे काही फोटोही काम्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत काम्या तिच्या गर्लगँगसोबत मस्ती करताना दिसली होती. 13 / 14 काम्या पंजाबीचे हे दुसरे लग्न आहे. 2003 मध्ये काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 10 वषार्नंतर 2013 साली तिने पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. तिला 9 वर्षाची एक मुलगी आहे.14 / 14 शलभचेही हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून 10 वर्षांचा एक मुलगा आहे. हळदीच्या कार्यक्रमात काम्याचा आनंद ओसंडून वाहत होता.