Join us

कब खून खौलेगा रे तेरा? कंगनाच्या ट्विटनंतर नेटक-यांचा हृतिकला सवाल, मीम्सचा आला पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 1:10 PM

1 / 10
ट्विटरवर पुन्हा एकदा #HrithikRoshan आणि #KanganaRanaut ट्रेंड करत आहेत. कारण काय तर हृतिक रोशन व कंगना राणौत प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. 2016 मध्ये हृतिकने कंगनाविरोधात एफआयआर दाखल केली होती. हेच ते प्रकरण. आता गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करेल.
2 / 10
आता यावर कंगना प्रतिक्रिया देणार नाही, असे कसे होणार? एका छोट्याशा अफेअरसाठी किती रडणार? असा टोमणा कंगनाने हृतिकला मारला. यावर ट्विटरवर मीम्सचा जणू पूर आला. तेरा खून कब खौलेगा रे? असा सवाल अनेक नेटक-यांनी हृतिकला विचारला.
3 / 10
कंगना रनौत आणि ऋतिक रोशनचा वाद अनेकजण विसरले नसतील, हे प्रकरण किमान ऋतिक-कंगनाच्या चाहत्यांच्या तरी लक्षात असेलच तीन-चार वर्षांपूर्वी प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली आहे.
4 / 10
ऋतिकबद्दल मनात असलेली सगळी भडास तिने बाहेर काढली होती. हृतिकवर आरोप करताना कंगनाने त्यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. अगदी माध्यमासमोर हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले होते.
5 / 10
‘क्रिश 3’ चित्रपटादरम्यान ऋतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र ऋतिकने कंगना खोटे बोलत असल्याचे सांगितले होते.
6 / 10
या दोघांमधील वाद इतका वाढला होता की, दोघांनाही याप्रकरणी कायदेशीर मदत घ्यावी लागली.
7 / 10
या वादात त्यावेळी अनेकांनी कंगनाची बाजू घेत ऋतिकवर टीका केली होती. तर ऋतिकचे चाहते ऋतिकच्या बाजूने होते. या दोघांच्या चाहत्यांमध्ये चांगलेच ट्विटर वॉर रंगले होते.
8 / 10
या काळात कंगना हृतिकबद्दल नाही नाही ते बोलली. ऋतिकने मात्र त्यावर उत्तर देण्याऐवजी मौन बाळगत केवळ आपल्या कामाकडे लक्ष दिले.
9 / 10
कंगनाने माध्यमांसमोर ऋतिकबद्दल, त्यांच्यातील प्रेमसंबंधांबद्दल, ऋतिकच्या कुटुंबियांबद्दल अनेक वक्तव्ये केली होती.
10 / 10
त्यावेळी अनेकांना कंगना पीडित असल्याचे वाटले होते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये कंगनाने अनेकांशी ज्या पद्धतीने पंगा घेतला, त्यावरून आधी कंगनाची बाजू घेणा-या अनेकांना आपल्या चुकीची उपरती झाली आहे. त्यामुळे कंगना-ऋतिकच्या वादात ज्यांनी पूर्वी कंगनाची बाजू घेतली होती. त्यांना आता ऋतिकची काही चूक नव्हती, असे वाटू लागले आहे. अलीकडे अनेकांनी त्यामुळे सोशल मीडियाद्वारे ऋतिकची माफी मागितली होती.
टॅग्स :कंगना राणौतहृतिक रोशन