'कांटा लगा गर्ल'ने बोटोक्स करून बदललं चेहऱ्याचं सौंदर्य, गुबगुबीत गाल आणि मोठे ओठ पाहून हैराण झाले चाहते By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 12:03 PM1 / 9बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवालाला कांटा लगा गर्ल म्हणून ओळखली जाते. अलीकडेच शेफाली पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये दिसली, जिथे तिने स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. 2 / 9कांटा लगा गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये दिसली. शेफालीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. तिने तिचा बदललेला चेहरा आणि बोटॉक्स किती वेदनादायक आहे याबद्दल देखील सांगितले. शेफालीचा हा पॉडकास्ट चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. 3 / 9अलिकडेच शेफाली जरीवाला टीव्ही अभिनेता पारस छाबरा यांच्या पॉडकास्ट शो 'आबरा का डाबरा'मध्ये मोकळेपणाने बोलली. शेफालीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक किस्से शेअर केले आहेत.4 / 9जेव्हा पारसने तिला विचारले की आजकाल प्रत्येकजण त्यांच्या चेहऱ्यावर फिलर लावतो आणि बोटॉक्स घेतो, तेव्हा तू काय सांगशील? शेफाली म्हणाली की ही प्रत्येकाची स्वतःची निवड आहे. ही काही वाईट गोष्ट नाही, एखाद्याला आपला लूक बदलायचा असेल तर काय बिघडले?5 / 9शेफाली म्हणाली की, माझ्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटते की माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र, तिने बोटॉक्स करून घेतल्याचे सत्य स्वीकारण्यास नकार दिला आणि म्हणाली की मी हे सांगणार नाही. ती हेदेखील म्हणाली की हे खूप वेदनादायक आहे.6 / 9शेफालीचे पूर्वीचा आणि आताचा फोटो पाहिल्यावर चेहऱ्यातील बदल स्पष्टपणे दिसत आहे. तिचे ओठ मोठे झाले आहेत आणि गाल सुजले आहेत. पूर्वी ती अशी दिसत नव्हती.7 / 9शेफाली तिच्या कांटा लगा या गाण्याने सर्वत्र चर्चेत आली होती. तेव्हापासून ती कांटा लगा गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली.8 / 9मात्र, शेफाली जरीवालाचा संपूर्ण लुक पूर्णपणे बदलला आहे. ती पूर्वीपेक्षा वेगळी दिसते. बोटॉक्सचा परिणाम तिच्या गालावर आणि ओठांवरही दिसून येतो. शेफालीने पॉडकास्ट दरम्यान सांगितले होते की हे खूप महाग आणि वेदनादायक देखील आहे.9 / 9शेफालीने १० वर्षांपूर्वी टीव्ही स्टार पराग त्यागीशी लग्न केले होते. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. या जोडप्याला अद्याप मूल नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications