Join us

Kareena Kapoor : रोमँटिक सीनपूर्वी करीनाने हिरोला म्हटलं 'भाऊ'; अभिनेता म्हणाला, "मी कधीच माफ करणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:21 IST

1 / 10
करीना कपूर ही बॉलिवूडमधली टॉपची अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने आपल्या करियरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. अशाच एका चित्रपटात तिने ज्या अभिनेत्यासोबत रोमँटिक सीन केला त्यालाच भाऊ असं म्हटलं आहे.
2 / 10
भाऊ म्हटल्यानंतर अभिनेता तिच्यावर रागावला आणि त्याने करीनाला कधीही माफ करणार नसल्याचं सांगितलं होतं. हा अभिनेता दुसरा कोणी नसून अभिषेक बच्चन आहे. करीना आणि अभिषेक दोघांनीही जेपी दत्ता यांच्या २००० मध्ये आलेल्या 'रिफ्युजी' या चित्रपटातून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती.
3 / 10
रिफ्युजीमध्ये करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्यात एक इंटिमेट सीनही चित्रित करण्यात आला होता, मात्र या सीनमुळे अभिषेक बच्चन करिनावर नाराज झाला. याबाबत त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो करिनाला कधीही माफ करणार नाही.
4 / 10
खरंतर या चित्रपटात करीना आणि अभिषेकमध्ये अनेक रोमँटिक सीन्स शूट होणार होते. अभिषेक बच्चन देखील रोमँटिक सीनसाठी खूप उत्सुक होता. मात्र, शूटिंगपूर्वी करीनाने अभिषेकला असं काही म्हटलं की त्याचा संपूर्ण मूडच बिघडला.
5 / 10
याचा खुलासा खुद्द अभिषेक बच्चनने सिमी गरेवालच्या शोमध्ये केला होता. याच दरम्यान त्याने त्याच्या पहिल्याच चित्रपटातील अभिनेत्री करीनाचं खूप कौतुक केलं होते.
6 / 10
'त्या सीनमध्ये मला उद्ध्वस्त केल्याबद्दल मी तुला कधीच माफ करणार नाही. कारण माझ्या लक्षात आहे की, तू मला पहिली गोष्ट म्हणालीस ती म्हणजे एबी, हा आपला पहिला चित्रपट आहे, एक रोमँटिक सीन एकत्र आहे आणि मी तुझ्या प्रेमात कसं पडू शकते? तू माझ्या भावासारखा आहेस' असं अभिषेकने म्हटलं आहे.
7 / 10
करीना आणि अभिषेकमध्ये एक स्पेशल इक्वेशन होतं. वास्तविक, करिनाची मोठी बहीण करिश्मा कपूर अभिनेत्याशी लग्न करणार होती. मात्र, करिश्मा आणि अभिषेकच्या विभक्त झाल्यानंतर करीना आणि अभिषेकचं नातं ही बदललं.
8 / 10
करीनाने राजीव मसंदला सांगितलं होतं की, मी नेहमी म्हणते की अभिषेक हा पहिला अभिनेता आहे ज्याच्यासोबत मी माझा पहिला शॉट दिला. माझ्या हृदयात त्याची एक खास जागा आहे. इतर कोणालाही ते स्थान देऊ शकत नाही. मी जेव्हा त्याच्याकडे पाहते तेव्हा मी आनंदाने अभिमानाने पाहते.
9 / 10
'रेफ्युजी' व्यतिरिक्त करीना कपूर आणि अभिषेक बच्चनने 'मैं प्रेम की दीवानी हूं' (२००३) मध्ये आणखी एका चित्रपटात काम केलं होतं.
10 / 10
टॅग्स :करिना कपूरअभिषेक बच्चनबॉलिवूड