IN PICS : ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवर हृतिक रोशन पडला होता एकटा; वाचा, पडद्यामागचा किस्सा By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 3:51 PM1 / 8अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरूख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला 19 वर्षे पूर्ण झालीत. 2 / 8करण जोहरने दिग्दर्शित केलेला हा दुसरा सिनेमा होता आणि बॉक्सआॅफिसवर तुफान गाजला होता. या सिनेमाने 55.65 कोटींची कमाई केली होती. याच सिनेमाबद्दलचा एक किस्सा खुद्द करणने त्याच्या ‘अॅन अनसुटेबल ब्वॉय’ या आत्मचरित्रात सांगितला आहे. हा किस्सा वाचून अनेकांना तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला होता.3 / 8 ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवर अमिताभ, शाहरूख, काजोल शिवाय अगदी जया बच्चन सुद्धा हृतिक रोशनपासून फटकून वागत. हृतिक याला याचा प्रचंड त्रास व्हायचा. त्याला वाईट वागायचे. आता हृतिकसोबत फटकून वागण्याचे कारण काय तर इर्षा. 4 / 8होय, ‘कहो ना प्यार है’ या सिनेमाच्या सक्सेसमुळे ‘कभी खुशी कभी गम’च्या सेटवर अनेकांना हृतिकला ‘दुश्मन’ असल्यासारखी वागणूक दिली होती. कहो ना प्यार है या सिनेमाच्या यशानंतर हृतिकची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. चक्क शाहरूखसोबत त्याची तुलना होऊ लागली होती.5 / 8करणने याबद्दल आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. तो लिहितो, ‘हे खूप चुकीचे होते. कारण हृतिक त्यावेळी खूपच ज्युनिअर होता आणि शाहरूख एक मोठा सुपरस्टार होता. पण त्यादरम्यान शाहरूखचे एक-दोन सिनेमे दणकून आपटले होते. दुसरीकडे हृतिकला मीडियाने डोक्यावर घेतले होते. यामुळे एक नकारात्मकता वाढली होती, जी चुकीची होती.6 / 8पुढे करण लिहिले, माझ्या मते, हृतिकला शूटींगदरम्यान कुठल्या ना कुठल्या गोष्टीची गरज होती. मात्र अमिताभ व जया त्यांच्यासोबत बोलत नव्हते. शाहरूखही त्याच्यापासून अंतर राखून होता. काजोल तर आधीपासूनच शाहरूखची मैत्रिण होती. हृतिक एखाद्या छोट्या मुलासारखा होता, जो जणू हरवला होता. सेटवर तो शक्य तितका चांगला वागण्याचा प्रयत्न करायचा. यादरम्यान आम्हा दोघांची चांगली मैत्री झाली होती.7 / 8‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमात अचला सचदेव यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका साकारली आहे. पण या भूमिकेसाठी वहिदा रहमान पहिली पसंत होत्या.8 / 8वहिदा यांनी हा सिनेमा साईनही केला होता. इतकेच नाही तर काही सीनचे शूटही केले होते. मात्र यादरम्यान त्यांचे पती कमलजीत यांचे निधन झाले होते आणि त्यांनी हा सिनेमा सोडला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications