Join us

Kareena Kapoor : 5 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर करीना कपूरने सैफसोबत लग्न करण्याचा का घेतला निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 3:30 PM

1 / 8
करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. हे दोघं सहा वर्षांचा मुलगा तैमूर आणि दोन वर्षांचा मुलगा जेहचे पालक आहेत.
2 / 8
करीना आणि सैफने 2012 मध्ये लग्न केलं आहे. याआधी हे दोघेही काही वर्षे एकत्र राहिले होते. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. अलीकडेच बेबोने सैफसोबत लग्न करण्याच्या तिच्या निर्णयाविषयी सांगितलं आहे.
3 / 8
द डर्टी मॅगझिनशी बोलताना करीना कपूर खान म्हणाली, 'तुम्ही आता लग्न करत आहात याचं कारण म्हणजे तुम्हाला आता मुल हवं आहे, बरोबर? म्हणजे माझं बोलण्यामागचा उद्देश असा आहे की नाहीतर तुम्ही एकत्र राहूच शकता.'
4 / 8
सैफ आणि करीना पाच वर्षे एकत्र राहत होते. त्यांनी पुढचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना मुलं हवी होती. करीना नेहमीच आपल्या ग्लॅमरस फोटोंसह मुलांचे देखील फोटो शेअर करत असते.
5 / 8
पालकत्वावर आपलं मत मांडताना करीना कपूरने कोणतीही पद्धत चुकीची किंवा बरोबर नसते असं म्हटलं आहे. तसेच ती आणि सैफ तैमूर आणि जेह दोन्ही मुलांना इंडिविज्युअल म्हणून ट्रीट करतात.
6 / 8
मुलांचा आदर करतात. त्यांना त्यांच्या जगात राहू देतात. मुलं स्वतःचा मार्ग शोधतील, मुलं खूप फ्लेक्सिबल असतात असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. करीनाने सुजॉय घोषच्या 'जाने जान' या चित्रपटाद्वारे ओटीटी पदार्पण केले.
7 / 8
हंसल मेहताच्या 'द बकिंगहॅम मर्डर्स'मध्येही काम केलं आहे. 67 व्या BFI लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचा प्रीमियर झाला. करीना लवकरच 'द क्रू'मध्ये तब्बू, क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
8 / 8
टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान