करिना कपूरने वजनावरून विद्या बालनला मारला होता टोमणा, मिळालं होतं सडेतोड उत्तर... By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 10:05 AM1 / 8बॉलिवूडमधील कलाकारांचं एकमेकांशी पटतंच असं नाही. काही कलाकारांमध्ये सतत शितयुद्ध सुरू असतं. ते वेगवेगळ्या मुलाखतींमधून एकमेकांना टोमणे मारत असतात. त्यांच्या या कमेंट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. 2 / 8करिना कपूर आणि विद्या बालन यांच्यातील नातंही असंच आहे. एकदा करिना कपूरने विद्या बालनला तिच्या वजनावरून टोमणा मारला होता. त्यावेळी करिना कपूरची ही कमेंट चर्चेचा विषय ठरली होती. 3 / 8विद्या बालनने २०११ साली आलेल्या 'द डर्टी पिक्चर' सिनेमासाठी बरंच वजन वाढवलं होतं. यात तिने सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. याचदरम्यान करिना कपूर 'टशन' सिनेमाचं शूटींग करत होती. या सिनेमातील तिच्या झिरो फिगरची चांगलीच चर्चा झाली होती.4 / 8एका इव्हेंटमध्ये करिना विद्याला टोमणा मारत म्हणाली होती की, 'लठ्ठ असणं सेक्सी असणं नसतं. जे कुणी असं म्हणतात तो त्यांचा गैरसमज आहे. कर्वी होणं सेक्सी होणं आहे. पण लठ्ठ असणं नाही. जी महिला म्हणते की, तिला बारीक व्हायचं आहे ती वायफळ बोलत आहे. ही प्रत्येक मुलीची इच्छा असते'.5 / 8करिना कपूर इतक्यावरच थांबली नाही. ती पुढे म्हणाली होती की, 'होऊ शकतं की, हा अभिनेत्रींसाठी ट्रेन्ड असेल. पण मला निश्चितपणे लठ्ठ दिसायचं नाहीये'.6 / 8करिना कपूरच्या या टोमण्याला विद्या बालनने सुद्धा सडेतोड उत्तर दिलं होतं. ती म्हणाली होती की, 'हा 'द डर्टी पिक्चर' वाईट असू शकत नाही. ते लोक एक 'हिरोईन' बनवू शकतात. पण कुणीही 'द डर्टी पिक्चर' बनवू शकत नाही'. 7 / 8दरम्यान २०१२ साली करिना कपूरचा 'हिरोईन' रिलीज झाला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता. विद्याने याच सिनेमाला धरून करिनावर पलटवार केला होता.8 / 8करिना कपूर आणि विद्या बालन यांचं नातं खूप वर्षांपासून असंच तणावाचं आहे. करिनाचं शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचं नातं बिघडल्याची चर्चा होती. असो, विद्याने अनेकदा हे मान्य केलं आहे की, हार्मोन्सच्या समस्येमुळे तिला तिचं वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications