Join us

IN PICS : या ‘पॉवर’ कपल्सची संपत्ती पाहून डोळे दिपतील, जाणून घ्या टोटल नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 5:21 PM

1 / 8
कतरिना कैफ व विकी कौशल हे सध्या चर्चेत असलेलं सर्वात हॉट कपल. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. या कपलची एकूण संपत्ती 249 कोटी रूपये आहे.
2 / 8
अनुष्का शर्मा बॉलिवूडची स्टार तर विराट कोहली क्रिकेटचा सुपरस्टार. दोघंही अलिशान आयुष्य जगतात. मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्काची नेट वर्थ 270 कोटी आहे तर विराटची 900 कोटी. दोघंही जाहिरातींमधून बक्कळ कमाई करतात.
3 / 8
शाहरूख खान व गौरी खान या जोडप्याकडं तर पैशाची कमतरता नाहीच. शाहरूख अभिनेता आहे. शिवाय रेड चिली एंटरटेनमेंट नावाचं त्याचं प्रॉडक्शन हाऊस आहे. गौरी एक निर्माती व इंटेरिअर डिझायनर आहे. या जोडप्याची एकूण संपत्ती 6000 कोटींच्या घरात आहे.
4 / 8
करिना कपूर व सैफ अली खान हे बी-टाऊनचं सर्वात श्रीमंत कपल आहे. रिपोर्टनुसार, सैफ अली खानची नेटवर्थ 1120 कोटी आहे तर करिनाची 440 कोटी आहे. दोघांची एकूण नेटवर्थ 1540 कोटी आहे.
5 / 8
राणी मुखर्जीनं आदित्य चोप्रासोबत लग्नगाठ बांधली. राणीची नेटवर्थ 133 कोटी आहे तर तिच्या पतीची 6350 कोटी . धक्का बसला ना? म्हणजेच या सेलिब्रिटीची एकूण नेटवर्थ 6483 कोटी आहे.
6 / 8
अक्षय कुमार व ट्विंकल खन्नाची एकूण नेटवर्थ वाचून तुमचे डोळे पांढरे होती. अक्षय कुमारची नेटवर्थ 2414 कोटी आहे तर ट्विंकलची 210 कोटी. म्हणजेच एकूण नेटवर्थ किती तर 2624 कोटी रूपये.
7 / 8
सोनम कपूरनं बिझनेसमॅन आनंद आहुजासोबत लग्नगाठ बांधलीये. सोनमची नेटवर्थ 95 कोटी आहे तर आनंदची 3000 कोटी.
8 / 8
रणवीर सिंग व दीपिका पादुकोण या सुपरस्टार कपलची नेटवर्थ ऐकून तुम्ही थक्क व्हाल. दीपिकाची नेटवर्थ 300 कोटी आहे तर रणवीरची 351 कोटी.
टॅग्स :बॉलिवूडसैफ अली खान करिना कपूरदीपिका पादुकोण