चाळीशीत पदार्पण करणाऱ्या बेबोने सांगितली ‘विश लिस्ट’, असा साजरा झाला करिनाचा वाढदिवस By रूपाली मुधोळकर | Published: September 21, 2020 10:22 AM1 / 10बेबो अर्थात करिना कपूर 40 वर्षांची झाली. होय, काल रात्री 12च्या ठोक्याला तिचा वाढदिवस दणक्यात साजरा झाला. या सेलिब्रेशनचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.2 / 10बेबोचा बर्थ डे केके अगदीच खास होता. यावर बेबोची डमी बनवलेली होती.3 / 10या फोटोंमध्ये करीना आई बबीता कपूर, वडील रणधीर कपूर करिश्मा कपूर यांच्यासह बर्थडे पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत.4 / 10करिनाने आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी तिचा पती सैफ अली खान, बहीण करिश्मा कपूर, आई बबीता, पपा रणधीर कपूर असे सगळे एकत्र दिसले.5 / 10करिना लवकरच दुस-यांदा आई होणार आहे. सध्या ती प्रेग्नंसी एन्जॉय करतेय.6 / 10या पार्टीचे काही खास फोटो करिश्माने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.7 / 10 चाळीशीत पदार्पण करणा-या बेबोने आपल्या वाढदिवसाच्या काही तास आधीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने तिची विश सांगितली आहे.8 / 10आपल्या इतक्या वर्षांचा अनुभव आणि आपल्या इच्छा तिने या पोस्टच्या माध्यमातून मांडल्या आहेत.9 / 10 ‘मी वयाच्या चाळीशीत पदार्पण करत आहे. मला खूप प्रेम करायचे आहे, हसायचे आहे, माफ करायचे आहे, विसरायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रार्थना करायची आहे आणि मला ताकद देणा-यांचे आभार मानायचे आहे, असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.10 / 10शिवाय, आज मी जशी आहे तशी महिला बनवणारे माझे अनुभव आणि विचार यांचीही मी आभारी आहे. त्यापैकी काही योग्य, काही अयोग्य, काही खूप चांगले आणि काही चांगलेही नव्हते. पण तरी, हे बिग 40! आणखी बिग करू, असे या पोस्टमध्ये बेबोने लिहिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications