Join us

करीना, ऐश्वर्याला सोडा अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीच्या एंगेजमेंट रिंगची किंमत ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 7:56 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री नेहमी महागड्या रिंग्स फ्लॉन्ट करताना दिसतात. आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या पार्टनरने त्यांना महागड्या रिंग्स देऊन लग्नासाठी प्रपोझ केले होते.
2 / 9
लग्नात सर्वात महागडी रिंग अभिनेत्री आसिनला मिळाली आहे. असिनने २०१६ रोजी बिझनेसमन राहुल शर्मासोबत लग्न केले होते. या रिंगची किंमत जवळपास ६ कोटी इतकी आहे.
3 / 9
अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडेही कोटींची रिंग आहे. ती देखील बऱ्याचदा रिंग दाखवताना दिसते. राज कुंद्राने लग्नाच्या वेळी शिल्पाला २० कॅरेटची रिंग दिली होती. ज्याची किंमत तीन कोटी इतकी आहे.
4 / 9
अभिनेत्री दीपिका पादुकोणने २०१८ साली रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. या लग्नाची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. दीपिकाच्या या एंगेजमेंट रिंगची किंमत २.५ कोटी इतकी आहे.
5 / 9
प्रियंका चोप्राने निक जोनास सोबत लग्न केले. नेहमी प्रियंका तिची एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसते. तिच्या या रिंगची किंमत २.१ कोटी इतकी आहे.
6 / 9
२०१७ साली अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले. अनुष्काच्या रिंगची किंमत १ कोटी रुपये इतकी आहे.
7 / 9
अभिनेत्री सोनम कपूरने दिल्लीत बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न केले आहे. तिच्या रिंगची किंमत ९० लाख इतकी आहे.
8 / 9
२०१२ मध्ये सैफ अली खान आणि करीना कपूरने लग्न केले. सैफने करीनाला जी अंगठी घातली ती ७५ लाखांची आहे.
9 / 9
२००७मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने लग्न केले. ऐश्वर्या नेहमी एंगेजमेंट रिंग घालते. या रिंगची किंमत ५० लाख रुपये आहे.
टॅग्स :असिनकरिना कपूरऐश्वर्या राय बच्चनसोनम कपूरशिल्पा शेट्टी