'करिश्मा का करिश्मा' फेम अभिनेत्रीमध्ये झालाय कमालीचा बदल; आता तिला ओळखणं म्हणजे जणू टास्क By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 2:32 PM1 / 10आज प्रत्येक सिनेमा, मालिकांमध्ये कलाकारांसोबतच बालकलाकारही पाहायला मिळतात. यात सध्या असे काही बालकलाकार आहेत जे मोठे झाले आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे झनक शुक्ला.2 / 10करिश्मा का करिश्मा या मालिकेतील झनक सगळ्यांच्याच लक्षात असेल. बालकलाकार असलेल्या झनकने त्यावेळी या मालिकेत एका रोबोटची भूमिका केली होती.3 / 10९० च्या दशकात ही मालिका खूप गाजली होती. विशेष म्हणजे तिने रोबोटची भूमिका उत्तमरित्या साकारली होती.4 / 10झनक आता मोठी झाली असून ती कलाविश्वापासून दूर गेली आहे. त्यामुळे ती कशी दिसते, काय करते असे प्रश्न चाहत्यांना पडतात.5 / 10कलाविश्वापासून दूर गेलेली झनक सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.6 / 10झनकमध्ये आता कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे तिला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे. 7 / 10झनकला नवनवीन ठिकाणांना भेट देणं, भटकंती करणं विशेष आवडतं. त्यामुळे ती कायम नवीन ठिकाणी फिरताना दिसते.8 / 10झनकला कधीच इंडस्ट्रीत काम करायचं नव्हतं. तिला कायम अभिनेत्री सोडून अन्य क्षेत्रात काम करायचं होतं. यात तिला सामाजिक कार्य करायला जास्त आवडतं असं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.9 / 10झनकची आई टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. सुप्रिया शुक्ला असे तिच्या आईचे नाव आहे. त्यामुळे बालपणापासून अभिनयाचे बाळकडू झनकला आईकडूनच मिळाले.10 / 10 सुप्रिया शुक्ला 'कुमकुम भाग्य' मालिकेत आणि 'मै हुँ हिरो तेरा' सिनेमातही झळकल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications