Join us

आधी घटस्फोटाचं दुःख, सिंगल पॅरेंट म्हणून मुलांचा सांभाळ; असं आयुष्य जगतायेत बॉलिवूडमधील या अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 4:03 PM

1 / 8
प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात सेलिब्रेटीही याला अपवाद नाहीत. बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींचा घटस्फोट झाला तेव्हा त्यांनी पुन्हा लग्न करण्याऐवजी मुलांची सिंगल मदर म्हणून जबाबदारी एकट्याने उचलली. ग्लॅमरसच्या दुनियेत स्वत:ला सिद्ध करण्याच्या धडपडीत सिंगल मदर होऊन जगणे म्हणावे तेवढे नक्कीच सोपे नाही. इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवताना मुलांचा सांभाळ करणे एखाद्या कसोटीप्रमाणे असते. अशाच काही बॉलिवूडमधील सिंगल मदरचा संघर्ष आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 8
संगीता बिजलानीच्या सलमान खानसोबतच्या अफेअरची बरीच चर्चा होती, मात्र तिने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले. जवळपास 14 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2010 मध्ये दोघे वेगळे झाले. 62 वर्षीय अभिनेत्री एकटीच राहत आहे. ती सलमान खानसोबत स्पॉट झाली होती, ज्याच्याशी तिला एकदा लग्न करायचे होते. (फोटो क्रेडिट्स: Instagram )
3 / 8
महिमा चौधरीने तिच्या पहिल्याच चित्रपट 'परदेस'मध्ये अप्रतिम भूमिका साकारली होती. 49 वर्षीय अभिनेत्रीने काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 2006 मध्ये बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. जवळपास 7 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले. तिने आपली मुलगी आर्याना चौधरीला सिंगल मदर म्हणून संभाळतेय. (फोटो क्रेडिट्स: Instagram )
4 / 8
करिश्मा कपूरला लव्ह लाइफमध्ये अनेक विश्वासघातांना सामोरे जावे लागले, पहिले प्रेम मिळाले नाही, साखरपुडा तुटला आणि नंतर लग्नाच्या अनेक वर्षानंतर अभिनेत्रीने घटस्फोट घेतला. (फोटो क्रेडिट्स: Instagram )
5 / 8
संजय कपूरसोबत १३ वर्षांच्या लग्नानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला.आता करिश्मा सिंगल पालक म्हणून तिच्या दोन मुलांची काळजी घेत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram )
6 / 8
अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट पूजा बेदी सिंगल मदर असून, आपल्या मुलांचे पालनपोषण करण्यात ती कुठलाच कसूर ठेवत नाही. पूजाने फरहान इब्राहिमशी लग्न केले होते. मात्र काही मतभेदांमुळे हे दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतर पूजाने आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारली. आता ती एकटीच मुलगा आणि मुलींचा सांभाळ करीत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram )
7 / 8
सुझैन खान आणि हृतिक रोशनने 2000 मध्ये लग्न केले, त्यानंतर ते सुमारे 14 वर्षांनी वेगळे झाले. या अभिनेत्याच्या अफेअरमुळे त्यांच्यात घटस्फोट झाल्याचे बोलले जात होते. तर दुसरीकडे सुझानचे अर्जुन रामपालसोबत अफेअर असल्याच्याही चर्चा होत्या. (फोटो क्रेडिट्स: Instagram )
8 / 8
घटस्फोटानंतर दोन्ही मुले आई सुझैन खान सोबत राहतात. सुझैन खान दोनही मुलांचा सिंगल मदर म्हणून संभाळ करते. हृतिक आणि सुझान अजूनही मित्र आहेत. 47 वर्षीय सुझैन आपल्या मुलांना हृतिकला भेटायला पाठवत असते.(फोटो क्रेडिट्स: Instagram )
टॅग्स :करिश्मा कपूरमहिमा चौधरीपूजा बेदी