Join us

सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 12:35 PM

1 / 10
महाराष्ट्रातील जिगरबाज सांगलीच्या वाघाची कहाणी बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घालतेय. कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित चंदू चॅम्पियन सिनेमात ज्या व्यक्तीची कथा सांगितली आहे ती भारताला पॅरालिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांची आहे.
2 / 10
१९७२ साली जर्मनी पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सूवर्ण पदक मुरलीकांत पेटकर यांनी मिळवून दिलं. मुरलीकांत पेटकर हे मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आहेत. सध्या ते पुण्यात स्थायिक असतात. पेटकर यांनी केवळ भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं नाही तर पॅराल्मिपिक स्विमिंगमध्ये एक विश्व रेकॉर्ड बनवला आहे.
3 / 10
मुरलीकांत पेटकर यांचं योगदान पाहता २०१८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे मुरलीकांत पेटकर यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना कु्स्तीची आवड होती. मुरलीकांत यांनी पुण्यात आर्मी बॉयज येथून शिक्षण घेतले. सुरुवातीला सैन्यात हॉकी खेळणं सुरू केले. परंतु फायनल टीममध्ये त्यांचे सिलेक्शन झालं नाही.
4 / 10
त्यानंतर मुरलीकांत पेटकर यांनी बॉक्सिंगची सुरुवात केली. बॉक्सिंगमध्ये मुरलीकांत यांनी अनेक पदके जिंकली. १९६४ साली जपानमध्ये आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी सिल्वर मेडल जिंकले. परंतु १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर त्यांचं आयुष्य पूर्ण बदललं.
5 / 10
१९६५ साली भारत पाकिस्तान सीमेवर संध्याकाळी ४ वाजता अचानक पाकिस्तानकडून हल्ला झाला, त्यावेळी भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. या जवानांमध्ये मुरलीकांत पेटकर यांचा समावेश होता. शत्रूशी लढता लढता मुरलीकांत पेटकर यांच्या डोक्यावर, पाठीवर गोळ्या लागल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले.
6 / 10
जवळपास एक दीड वर्ष ते कोमात होते, त्यांना त्यांचे नावही आठवत नव्हते. परंतु मृत्यूशी झुंज त्यांनी जिंकली होती. आयुष्यभरासाठी ते दिव्यांग झाले. मात्र मुरलीकांत पेटकर यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी स्विमिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. तिथूनच त्यांचा पॅरालिम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याचा प्रवास सुरू झाला.
7 / 10
मुरलीकांत पेटकर सांगतात की, गावी मी शाळेत जाताना रस्त्यात कुस्तीचा आखाडा लागायचा. त्याठिकाणी मोठमोठ्या पैलवानाला पाहायचो. तिथेच मी कुस्ती खेळायला शिकलो. गावात कुस्तीच्या स्पर्धेत जिंकल्यानंतर १ पैसा मिळायचा, ६० च्या दशकात ग्रामीण भागात ही मोठी गोष्ट होती.
8 / 10
१९६५ ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू होतं. आम्ही काश्मीरला होतो, मला गोळ्या लागल्या. एक गोळी माझ्या हाडात घुसली ती आजही तिथेच आहे. गोळ्या लागल्याने मी डोंगरावरून खाली पडलो, त्यानंतर सहकाऱ्यांनी हॉस्पिटलला नेले, तिथे मला माझं नावही आठवत नव्हते. त्यानंतर कमरेखालून मला पॅरालाईज झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले असं मुरलीकांत पेटकर यांनी म्हटलं.
9 / 10
गावातील सरपंचाच्या मुलाला कुस्तीत हरवलं त्यामुळे मुरलीकांत पेटकर यांना अपमानित व्हावं लागले, त्यातून त्यांनी कुटुंबासह गाव सोडून दिले. या अपमानानंतर मुरलीकांत पेटकर भारतीय लष्करात दाखल झाले. लष्करातही मुरलीकांत पेटकरांनी त्यांचं कौशल्य दाखवले. त्याठिकाणी बॉक्सिंग शिकली. १९६४ मध्ये टोकियो येथे पेटकरांनी बॉक्सिंगमध्ये मेडल मिळवलं होतं.
10 / 10
भारताचे माजी क्रिकेटर विजय मर्चंट यांनी मुरलीकांत पेटकरांना पॅरालिम्पिक खेळात पोहचवलं. १९७२ मध्ये समर ओलिम्पिकमध्ये पेटकरांनी स्विमिंगमध्ये भाग घेतला. त्यावेळी ३७.३३ सेकंदात त्यांनी ही स्पर्धा जिंकत देशाचं नाव उंचावलं आणि ५० मीटर फ्रिस्टाइल स्विमिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले.
टॅग्स :कार्तिक आर्यनभारतीय जवानसुवर्ण पदकपोहणेपद्मश्री पुरस्कार