Kartik Aaryan : अभिनयामुळे सोडून गेली गर्लफ्रेंड; 'अशी' होती अभिनेता कार्तिक आर्यनची लव्ह लाईफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 13:51 IST
1 / 9अभिनेता कार्तिक आर्यनने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील टॉप कलाकारांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. कार्तिकच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. 2 / 9कार्तिक आर्यन त्याच्या लव्ह लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. अनेक अभिनेत्रींसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं. कार्तिकच्या लव्ह लाईफबद्दल सांगायचं तर कॉलेजच्या दिवसात त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती.3 / 9कार्तिक आर्यनने त्याच्या कॉलेज लाईफच्या वेळेची लव्हस्टोरी सांगितली होती. तो म्हणाला- माझ्या गर्लफ्रेंडने मला सांगितलं की, मी अभिनय केला तर ती माझ्यासोबत राहणार नाही. ती म्हणाली होती की, ती एका अभिनेत्याचं आयुष्य सांभाळू शकत नाही.4 / 9२०१९ मध्ये अभिनेत्री सारा अली खानसोबत कार्तिकचं नाव जोडलं गेलं होतं. इम्तियाज अलीच्या लव्ह आज कल २ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं. 5 / 9दोघांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. मात्र, त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. ब्रेकअप झालं. आता दोघेही चांगले मित्र आहेत. साराच्या दिवाळी पार्टीत कार्तिक दिसला होता.6 / 9याशिवाय जान्हवी कपूरसोबतही त्याचं नाव जोडलं गेलं. दोस्ताना २ मध्ये दोघेही कास्ट झाले होते. मात्र, कार्तिक या प्रोजेक्टमधून बाहेर पडला आणि त्याचं जान्हवीसोबतचं नातंही फार काळ टिकलं नाही.7 / 9२०२१ मध्ये कार्तिक आणि अनन्या पांडेच्या अफेअरच्या बातम्याही चर्चेत होत्या. 'पति पत्नी और वो' या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत माहिती दिली नाही. पण करण जोहरने त्याच्या शोमध्ये त्यांच्या अफेअरचे संकेत दिले होते. 8 / 9कार्तिक आणि अनन्या फार काळ एकत्र नव्हते. यानंतर अनन्याचं नाव आदित्य रॉय कपूरसोबत जोडलं गेले. दोघेही काही काळ एकत्र राहिले आणि नंतर वेगळे झाले आहेत. 9 / 9