Join us

OMG!! कार्तिक आर्यन ‘महाग’ झाला ! ‘शहजादा’साठी घेतले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 5:49 PM

1 / 7
2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारा कार्तिक आर्यन आज स्टार आहे. अर्थात स्टार बनण्यासाठी त्याला 5-6 वर्ष लागलीत. पण मेहनत का फल मिठा होता है, म्हणतात ते उगाच नाही...
2 / 7
होय, सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीने कार्तिकला स्टार म्हणून ख-या अर्थानं स्वीकारलं. या चित्रपटानंतर कार्तिकनं कधीच मागे वळून बघितलं नाही.
3 / 7
आता काय तर कार्तिक सर्वात बिझी स्टार आहे. त्याच्याकडे अनेक मोठे सिनेमे आहेत. साहजिकच डिमांड वाढतेय म्हटल्यावर फी सुद्धा वाढणार.
4 / 7
ताज्या रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनने ‘शहजादा’ या चित्रपटासाठी 21 कोटी रूपयांची डिमांड केली आहे. विशेष म्हणजे मेकर्सनी त्याची ही डिमांड मान्य केली आहे.
5 / 7
21 कोटी रूपये मानधन घेतल्यानंतर आता कार्तिक आर्यन बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या स्टार्सच्या यादीत सामील झाला आहे. त्याच्या समोर आता फक्त रणबीर कपूर व रणवीर सिंग आहेत. जे एका सिनेमासाठी 30 कोटी रूपयांपेक्षा अधिक मानधन घेतात.
6 / 7
कार्तिकचा ‘शहजादा’ हा सिनेमा साऊथचा सुपरहिट सिनेमा ‘अला वैकुंठपुरमलो’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. ‘अला वैकुंठपुरमलो’मध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत होता.
7 / 7
‘शहजादा’मध्ये कार्तिक आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत आहेत. याआधी ‘लुकाछुपी’ या सिनेमात ही जोडी एकत्र दिसली होती.
टॅग्स :कार्तिक आर्यन