IN PICS : नवऱ्यापेक्षा बायको श्रीमंत! पार्टनरपेक्षा जास्त कमावतात या बॉलिवूड अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 5:29 PM1 / 6सध्या चर्चा आहे ती कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नाची. आता अशात त्यांच्या प्रॉपर्टीची चर्चा होणार नाही तर नवल. कतरिना म्हणे, विकीपेक्षा कितीतरी अधिक श्रीमंत आहे...2 / 6कतरिना कैफची नेटवर्थ विकी कौशलपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. अर्थात याला कारण म्हणजे, कतरिना फिल्म इंडस्ट्रीत विकीपेक्षा बरीच सीनिअर आहे. रिपोर्टनुसार, कॅटची एकूण संपत्ती 224 कोटी आहे तर विकीची 25 कोटी रूपये.3 / 6दीपिका पादुकोणही पती रणवीर सिंगपेक्षा श्रीमंत आहे आणि का नसावी? दीपिका आजघडीला बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री आहे. कथितरित्या तिची एकूण संपत्ती 316 कोटी रूपये आहे तर रणवीरची 307 कोटी रूपये आहे.4 / 6बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय ही सुद्धा पती अभिषेक बच्चनपेक्षा श्रीमंत आहे. ऐश्वर्याची एकूण संपत्ती 227 कोटी आहे तर अभिषेक 203 कोटींचा मालक असल्याचं सांगितलं जातं.5 / 6हेमा मालिनी व धर्मेन्द्र ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी. हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती 440 कोटी असल्याचं सांगितलं जातं. तर धर्मेन्द्र यांची संपत्ती 335 कोटी रूपये असल्याचं कळतं.6 / 6या यादीत बिपाशा बासू व करण सिंग ग्रोव्हर यांचंही नाव आहे. काही वर्षांपूर्वी बिपाशाची एकूण संपत्ती 113 कोटी रूपये होती तर करणची फक्त 13 कोटी रूपये. आणखी वाचा Subscribe to Notifications