कविता कौशिकने टीव्ही इंडस्ट्रीला केला रामराम? पतीसोबत उत्तराखंडमध्ये करतेय 'हा' व्यवसाय By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 11:41 AM1 / 8FIR या गाजलेल्या हिंदी मालिकेत चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) पडद्यावरुन गायब झाली आहे. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. बिग बॉस 14 मध्येही ती सहभागी झाली. आता अभिनेत्री करतेय तरी काय?2 / 8कविता कौशिकने टीव्ही इंडस्ट्रीला कायमचा राम राम केला असून आता ती पतीसोबत डोंगराळ भागात शिफ्ट झाली आहे. कविता सध्या उत्तराखंडमध्ये राहत आहे. टीव्ही इंडस्ट्री सोडण्यामागचं कारणही तिने सांगितलं. 3 / 8टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कविता कौशिक म्हणाली, 'मी सलग 30 दिवस काम करु शकत नाही. आता टीव्ही तर मला करायचंच नाही. मी वेब सीरिज, सिनेमात काम करण्यासाठी तयार आहे. पण मी काही कोणी साधी अभिनेत्री नाही जिला सहजपणे कास्ट करण्यात येईल. माझ्या पर्सनॅलिटीला साजेशा अशा काहीच भूमिका आहेत.'4 / 8मला शैतानी रस्मे, डायन टीव्ही शोज ऑफर होत राहतात. पण मला ते काम करायचं नाही. हे मी आधी ३ वर्षांपूर्वी करायचे. तेव्हा मी पूर्ण वेळ टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होते. माझं वयही कमी होतं. तेव्हा मजा आली पण आता करु शकणार नाही.5 / 8आता तसंही टीव्हीवरचा कंटेट कंटाळवाणा झाला आहे. एक वेळ होती जेव्हा टीव्ही डेव्हलप होत होता आणि वेगवेगळे शोज येत होते. त्यात विविधता होती प्रेक्षकांचं मनोरंजन व्हायचं.6 / 8कविता पती रोनित बिस्वाससोबत उत्तराखंडमध्ये शांत आयुष्य जगत आहे. तिथे दोघांनी मिळून आयुर्वेदिकचा व्यवसाय सुरु केला आहे. आता मी मुंबईत फक्त शूटिंगसाठी येते. 7 / 8आधी आम्ही गोव्यात राहायचो. पण तिथला उकाडा मला सहन झाला नाही. इथे उत्तराखंडमध्ये सगळं सामान मिळतं. इथलं वातावरण छान आहे.8 / 8उत्तराखंडमध्ये आमचा एक बंगला आहे. आम्ही इथेच काही पीकही उगवतो. आता मी गायही पाळणार आहे. इथलं आयुष्य खरंच खूप छान आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications