KBC 14: केबीसीत 7.5 कोटींसाठी क्रिकेटमधील 'हा' प्रश्न? मराठमोळ्या कवितांनी केलं क्वीट By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 5:52 AM1 / 10छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) देशातील कोट्यवधी लोकांचा आवडता शो आहे. सध्या या शोचा चौदावा सीझन सुरु आहे. प्रत्येक सीझन करोडपती कोण होणार, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक असतात. त्यातही करोड रुपयांसाठीच्या प्रश्नाची सर्वांनाच उत्सुकता असते. 2 / 10कौन बनेगा करोडपती सीझन १४ चा पहिला करोडपती मिळाला आहे. कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या कविता चावला एक कोटी रुपये जिंकल्या आहेत. या सीझनमध्ये १ कोटी कमावणारी पहिलीच स्पर्धक कविता चावला ठरली आहे. तसेच, कोल्हापूरच्याही त्या पहिल्याच करोडपती विजेता महिला आहेत. 3 / 10कविता चावला यांनी कौन बनेगा करोडपती शोमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, त्या हॉटसीटपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या. पण त्या पुन्हा जिद्दीने शोमध्ये परतल्या. गृहिणी असलेल्या ४५ वर्षीय कविता यांनी १ कोटी रुपये जिंकले आहेत. 4 / 10कविता यांनी ७ कोटींच्या प्रश्नावर अखेर गेम क्वीट करण्याचा निर्णय घेतला आणि १ कोटी रुपयांवरच त्यांना समाधान मानावे लागले. ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांना आलं नाही, तो ७.५ कोटी रुपयांचा प्रश्न हा क्रिकेटशी निगडीत होता. मात्र, हे उत्तर माहिती नसल्याने त्यांनी गेम क्वीट केला. 5 / 10कविता त्यांचा मुलगा विवेकसोबत शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. सोमवार आणि मंगळवारी हा भाग सोनी टीव्हीवर प्रसारित करण्यात आला. त्यामुळे मराठी आणि कोल्हापूरचे प्रेक्षक हा एपिसोड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्सुक दिसून आले. मंगळवारी कविता यांना ७ कोटींचा प्रश्न विचारण्यात आला, तो देशाने पाहिला.6 / 10'प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पणात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय असलेल्या गुंडप्पा विश्वनाथनने (Gundappa Vishwanath) कोणत्या संघाविरुद्ध ही कामगिरी केली होती?' असा प्रश्न 7.5 कोटी रुपयांसाठी कविता यांना विचारण्यात आला. मात्र, त्यांना या प्रश्नाचे उत्तर आले नाही. 7 / 10 या प्रश्नासाठी सर्व्हिस, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि सौराष्ट्र असे 4 पर्याय कविता यांना देण्यात आले होते. त्यापैकी, आंध्र प्रदेश हे अचूक उत्तर होते. मात्र, ते कविता यांना खात्रीशीरपणे माहिती नव्हते. त्यामुळे, त्यांनी गेम क्वीट केला. गुंडप्पा विश्वनाथ यांनी 1967 मध्ये म्हैसूरकडून रणजीत पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्यांनी आंध्रप्रदेश विरुद्ध 230 धावांची द्विशतकी खेळी केली होती.8 / 10दरम्यान, 'कौन बनेगा करोडपती' या शोचा प्रत्येक सीझन खूप लोकप्रिय ठरतो. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या चौदाव्या सीझनलाही भरपूर प्रेम मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. प्रत्येक सीझनमध्ये सहभागी होणारे स्पर्धक खूप उत्साही असतात.9 / 10या कार्यक्रमाला कोल्हापूरमधून ४० बच्चनवेड्यांनी उपस्थिती दर्शवली होती. कविता यांना एक कोटी रूपयांचे बक्षिस जाहीर होताच या उपस्थित कोल्हापूरच्या बच्चनवेड्यांनी जल्लोष केला. 10 / 10यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनीही चावला यांनी कोल्हापूरचे नाव उज्जवल केल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे, कोल्हापूरवासीयांना आनंद झाला. तर, एका मराठमोळ्या गृहिणीनं १ कोटी जिंकल्याचा महाराष्ट्राला आनंद झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications