KGF 2: जाणून घ्या कोण आहे रॉकी भाईची पत्नी, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देते टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 1:30 PM1 / 12सुपरस्टार यशची पत्नी राधिका पंडित ही दोन मुलांची आई आहे. ती स्वतः देखील एक अभिनेत्री आहे आणि सध्या ती कामासोबतच आपल्या कुटुंबाचीही काळजी घेते. (Photo Instagram) 2 / 12राधिका पंडित सौंदर्यांच्याबाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते. ती अनेकदा तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.(Photo Instagram) 3 / 12राधिकाला शिक्षिका व्हायचे होते, पण ती जेव्हा बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला होती तेव्हाच तिने अभिनय विश्वात प्रवेश केला. राधिकाच्या मैत्रिणीने तिला कन्नड टीव्ही शोमध्ये ऑडिशन देण्यासाठी संपर्क साधला होता. (Photo Instagram) 4 / 12या टीव्ही सीरियलचे नाव 'नंदा गोकुळा' होते, ज्यामध्ये राधिकाला ऑडिशन न देता काम मिळाले. यानंतर राधिका सुमंगली नावाच्या दुसऱ्या टीव्ही मालिकेत दिसली.(Photo Instagram) 5 / 12 यानंतरच राधिकाचा चित्रपट प्रवास सुरू झाला. दिग्दर्शक शशांकने राधिकाला त्याच्या 18th Cross आणि Mogginna Manasu या चित्रपटांमध्ये कास्ट केले होते. (Photo Instagram) 6 / 12राधिकासाठी तिची पहिली मालिका 'नंदा गोकुळा' खूप खास आहे कारण तिने या मालिकेतून पदार्पण केले होते आणि या मालिकेच्या सेटवर ती पहिल्यांदाच यशला भेटली होती. (Photo Instagram) 7 / 12या मालिकेत यश राधिकाच्या सोबत दिसला होता. यानंतर दोघांनी मोग्गीन्ना मनसु या चित्रपटातही एकत्र काम केले.(Photo Instagram) 8 / 12एकत्र काम करत असताना राधिका आणि यश यांची मैत्री झाली आणि नंतर हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Instagram) 9 / 12राधिका आणि यश यांनी त्यांचे नाते सीक्रेट ठेवले आणि त्यांनी अगदी खाजगी पद्धतीने लग्नही केले. (Photo Instagram) 10 / 12 सोशल मीडियावर राधिकाची फॅन फॉलोइंग पती यशपेक्षा कमी नाही. तिच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात.(Photo Instagram) 11 / 12राधिका आणि यश यांना दोन मुलं आहेत. अनेकदा त्यांच्या मुलांसोबत फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram) 12 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications