कियारा अडवाणी ते दिशा पाटनीपर्यंत या सेलेब्सनी सीक्रेट ठेवलं आपलं रिलेशनशिप By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 1:47 PM1 / 8बॉलीवूड असे बरेच सेलिब्रेटी आहेत जे आपली लव्ह लाईफ जगासमोर जाहिर करण्यात मागेपुढे बघत नाहीत, मात्र काही सेलेब्ल असते आहेत जे लग्नापर्यंत आपलं रिलेशनशीप सीक्रेट ठेवतात. कियारा अडवाणी (Kiara Advani), दिशा पटानी (Disha Patani) यांसारख्या आणखी काही अभिनेत्री आहेत, ज्या अनेकदा त्यांच्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत दिसतात. (Instagram kiaraaliaadvani /dishapatani)2 / 8कियारा आणि सिद्धार्थची जोडी केवळ ऑनस्क्रिन नाही तर ऑफस्क्रिनही चाहत्यांना आवडते. ते बॉलिवूडमधील सर्वात सुंदर कपलपैकी एक आहेत. त्यांना अनेकदा एकत्र हँग आउट करताना पाहिले गेले आहे. चाहते फक्त त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.(Instagram kiaraaliaadvan)3 / 8श्रद्धा कपूर अनेकवेळा रोहन श्रेष्ठसोबत दिसली आहे. त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या मीडियामध्ये खूप चर्चेत होत्या, पण आतापर्यंत त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेला नाही. (Instagram Shraddhakapoor)4 / 8मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मौन बाळगते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती 2022 मध्ये सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधू शकते. (Instagram mouniroy)5 / 8 मौनी दुबई किंवा इटलीमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, आतापर्यंत मौनीने तिच्या लग्नाच्या किंवा रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल काहीही सांगितलेले नाही. (Instagram mouniroy)6 / 8 दिशा पाटनी अनेकदा टायगर श्रॉफ आणि त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसली आहे. ते अनेकदा एकत्र व्हेकेशन, डिनरला जाताना दिसतात. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. . (Instagram kishushroff)7 / 8दिशा पाटनी आणि टायगरला जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल विचारले जाते तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून जातात, पण जे शब्दात सांगितले जात नाही ते त्यांच्या हावभावातून व्यक्त होते. (Instagram/dishapatani)8 / 8 करिश्मा तन्ना एकेकाळी उपेन पटेलसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती, मात्र आता ती वरुण बंगेरासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. 5 फेब्रुवारी 2022 रोजी ती वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या बातम्या आहेत. (Instagram/karishmaktanna) आणखी वाचा Subscribe to Notifications