कश्मिरा शाहचा पहिला नवरा कोण माहितीये का? घटस्फोटानंतर कृष्णा अभिषेकसोबत थाटला दुसरा संसार By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 11:46 AM1 / 9'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) . प्रोफेशन लाइफसोबत कृष्णा अनेकदा त्याच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो.2 / 9कृष्णा अभिषेकने अभिनेत्री कश्मिरा शाहसोबत (Kashmera Shah) लग्न केलं असून कश्मिरा अनेकदा तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत येत असते.3 / 9वयाच्या ४९ व्या वर्षी बोल्डनेसमुळे चर्चेत येणारी कश्मिरा तिच्या वैयक्तिक जीवनामुळेही चर्चेत येते. कश्मिराने कृष्णासोबत लग्न केलं असून यापूर्वी तिने एका निर्मात्यासोबत लग्नगाठ बांधली होती.4 / 9कृष्णाने त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या कश्मिरासोबत लग्न केलं असून २००५ मध्ये या दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.5 / 9कृष्णाला डेट करण्यापूर्वी कश्मिरा, ब्रॅड लिस्टरमॅन या निर्मात्याची पत्नी होती. परंतु, २००७ मध्ये तिने पतीला घटस्फोट दिला आणि कृष्णासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागली.6 / 9'और पप्पू पास हो गया' या चित्रपटाचं जयपूरमध्ये चित्रीकरण सुरु असतांना कश्मिरा आणि कृष्णाची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 7 / 9२००५ मध्ये कश्मिरा आणि कृष्णाची भेट झाली. त्यानंतर २००७ मध्ये कश्मिराने पती ब्रॅडला घटस्फोट दिला. त्यानंतर ती कृष्णासोबत काही वर्ष लिव्ह इनमध्ये राहिली व २०१३ मध्ये या जोडीने लग्न केलं.8 / 9मे २०१७ मध्ये कश्मिराने सरोगसी पद्धतीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.9 / 9कश्मिराने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'प्यार तो होना ही था', 'हिंदुस्तान की कसम', 'हेराफेरी', आंखें, मर्डर, आणि वेकअप सिड (2009) या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications