Join us  

लग्नानंतर मालामाल होणार विकी कौशल...; कतरिना कैफची संपत्ती बघून डोळे पांढरे होतील!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 12:44 PM

1 / 8
बॉलिवूडची बहुचर्चित जोडी विकी कौशल व कतरिना कैफ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या शाही विवाहसोहळ्याची तयारी जोरात सुरू आहेत. पण आज आम्ही कॅट व विकीच्या लग्नाबद्दल नाही तर त्यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत.
2 / 8
होय, लग्नानंतर कॅट व विकी दोघंही मालामाल होणार आहेत. तुम्हाला ठाऊक आहेच की, कतरिना ही बॉलिवूडची हायेस्ट पेड अभिनेत्री आहे. पाच वेळा ती ‘वर्ल्ड मोस्ट सेक्सिएस्ट वूमन’ राहिली आहे.
3 / 8
2019 मध्ये कॅट 100 सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्रींच्या यादीत 23 व्या स्थानी होती. रिपोर्टनुसार, कतरिनाची नेटवर्थ सुमारे 220 कोटी आहे.
4 / 8
कतरिना वर्षाला सुमारे 23.64 कोटी रूपये कमावते. एका जाहिरातीसाठी ती 6 ते 7 कोटी रूपये घेते आणि एका चित्रपटासाठी 11 कोटींचे मानधन घेते.
5 / 8
कतरिनाचा होणारा पती विकी कौशल हा सुद्धा 2019 च्या फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटींच्या यादीत सामील होता. रिपोर्टनुसार, त्याची एकूण नेटवर्थ 3 मिलियन डॉलर आहे. म्हणजे सुमारे 22 कोटी.
6 / 8
विकी कौशल दरवर्षी 3 कोटी रूपये कमावतो. एका सिनेमासाठी तो 3 ते 4 कोटी रूपये घेतो.
7 / 8
कतरिना लक्झरी लाईफ जगते. मुंबईतचं नाही तर विदेशातही तिची प्रॉपर्टी आहे. वांद्रे भागात तिचे 8 कोटींचं अपार्टमेंट आहे. लोखंडवालामध्ये 17 कोटींचं अपार्टमेंट आहे. एका पेंटहाऊसची ती मालकीन आहे. लंडनमध्येही तिचा बंगला आहे.
8 / 8
रेंज रोवर, मर्सिडीज बेंज, ऑडी क्यू 7, ऑडी क्यू 3 अशा अलिशान गाड्यांमधून ती फिरते. विकीने अलीकडे रेंज रोव्हर गाडी खरेदी केली आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंज जीएलसी एसयूव्ही कार आहे.
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल