1 / 8कितनी मोहब्बत है, कुछ तो लोग कहेंगे या मालिकेतून घराघरात पोहोचेली अभिनेत्री कृतिका कामरा सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. 2 / 8सध्या कृतिकाचे नाव उदय सिंह गौरीसोबत जोडले जातेय. दोघांनी साखरपुडा केल्याचेही मानले जातेय. पण कृतिकाने या सगळ्याचा इन्कार केला आहे.3 / 8ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कृतिकाने साखरपुडा झाल्याचा इन्कार केला. ना मी लग्न केलेय, ना साखरपुडा. अशा अफवा कुठून येतात मला माहित नाही, असे ती म्हणाली.4 / 8उदय गौरी सिंहसोबत रिलेशनशिपमध्ये आहेस का? असे विचारले असता तिने थेट उत्तर देणे टाळले. सध्या मी मुंबईतील माझ्या घरी आहे. माझे आयुष्य म्हणजे खुली किताब आहे. सध्या मात्र पर्सनल लाईफबद्दल शेअर करण्यासारखे माझ्याकडे काहीही नाही, असे ती म्हणाली.5 / 8मग तू सध्या सिंगल आहे का? असा थेट प्रश्न केला असता तिने त्याचे उत्तर देणे टाळले. असू शकते आणि नाहीही, असे ती म्हणाली.6 / 8या मुलाखतीत उदय गौरी सिंहचे नाव एकदाही कृतिकाच्या ओठांवर आले नाही. यावरून दोघांमध्ये सध्या सगळे ऑल वेल तर आहे ना? असा प्रश्न साहजिकच चाहत्यांना पडला आहे.7 / 8याआधी कृतिका अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. 8 / 8दोघांची भेट कितनी मोहब्बत है या टीव्ही शोच्या निमित्ताने झाली होती.