Join us

kunal khemu : "सोहाला सांगायला मला भीती..."; कुणाल खेमूने सांगितलं सैफवर हल्ला झाला तेव्हा काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:16 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर रात्री त्याच्या घरात घुसलेल्या एका चोराने चाकूने हल्ला केला होता, ज्यामध्ये अभिनेता गंभीर जखमी झाला. त्याच्यावर दोन सर्जरी करण्यात आल्या.
2 / 10
रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सैफला डिस्चार्ज देण्यात आला. तसेच आरोपीला देखील अटक करण्यात आली. आता अभिनेता कुणाल खेमूने सैफवरील हल्ल्याबद्दल भाष्य केलं आहे.
3 / 10
कुणाल खेमूने दिलेल्या मुलाखतीत, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितलं आणि म्हणाला की, त्यावेळी कुटुंबासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सैफची सुरक्षितता होती. सोहाला याबद्दल कसं सांगायचं हे त्याला समजत नव्हतं.
4 / 10
एएनआयशी बोलताना कुणाल म्हणाला, 'खरं सांगायचं तर, पहिली गोष्ट म्हणजे तो ठीक आहे का? हा विचार डोक्यात आला आणि एकदा आम्हाला कळलं की तो ठीक आहे, तेव्हा काहीही बोलण्यात अर्थ नव्हता कारण तीच एकमेव गोष्ट महत्त्वाची होती.'
5 / 10
'मला वाटतं की त्याबाबत सर्वकाही सैफने अलिकडच्या मुलाखतीत माहिती दिली आहे. मला वाटतं की त्याने ते सर्वोत्तम पद्धतीने मांडलं आहे, मी त्यात एक शब्दही जोडू इच्छित नाही.'
6 / 10
या हल्ल्याची माहिती कशी मिळाली हेही अभिनेत्याने सांगितलं. तो म्हणाला, 'सकाळी ६ वाजताच्या सुमारास मला एक फोन आला आणि मला काहीच माहिती नव्हती.'
7 / 10
'ही घटना घडली आहे आणि सैफ रुग्णालयात आहे आणि त्याच्यावर सर्जरी होणार आहे. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत.'
8 / 10
'भीती कशी काम करते हे खूप विचित्र आहे, मला हे तिला (सोहा अली खान) सांगावं लागलं. सोहाला सांगताना भीती वाटत होती. आम्ही आमच्या मुलीला शाळेसाठी तयार करत होतो.'
9 / 10
'तुमच्याकडे एवढीच माहिती होती, बाकी काही नव्हतं. मग हे कसं समजून घ्यावं, मी माझ्या मुलीला आता शाळेत पाठवायचं की नाही? मग मी म्हणालो की, आपल्याला तिथे जायला हवं आणि तेव्हाच आम्हाला हळूहळू काय घडलं आहे ते कळू लागलं.'
10 / 10
कुणालने सांगितलं की संपूर्ण कुटुंब सैफच्या तब्येतीची काळजी करत होतं आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होतं.
टॅग्स :कुणाल खेमूसैफ अली खान सोहा अली खानबॉलिवूड