आमिरचं टेन्शन वाढलं, Laal Singh Chaddhaला या राज्यात बॅन करण्यासाठी कोर्टात याचिका By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 1:49 PM1 / 7आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’((Laal Singh Chaddha) या चित्रपटाबाबत सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. 'लाल सिंग चड्ढा'बाबत एकामागून एक निराशाजनक बातम्या समोर येत आहेत.2 / 7आता कोलकाता उच्च न्यायालयात लाल सिंग चड्ढा यांच्या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.3 / 7*काय आहे प्रकरण?* लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत आधीच संघर्ष करत आहे आणि आता एका जनहित याचिकेद्वारे बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.4 / 7याशिवाय चित्रपटावर बंदी घातली नाही तर प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर पोलीस तैनात करावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.5 / 7या चित्रपटात जे दाखवले आहे त्यामुळे बंगालमधील शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणावर आज (मंगळवारी) सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.6 / 7मिळालेल्या माहितीनुसार, वकील नाझिया इलाही खान यांनी 'लाल सिंह चड्ढा'बाबत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते, बंगालमधील वातावरण सध्या धार्मिक मुद्द्यांसाठी खूपच अस्थिर आहे . ज्यामुळे चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बंगालमध्ये लालसिंग चड्ढा यांच्यावर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.7 / 7चित्रपटात लष्कराची भूमिका नीट मांडण्यात आलेले नाही, त्यामुळे त्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बंगालमध्ये लालसिंग चड्ढा यांच्यावर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications