'लापता लेडीज'मधली 'जया' नक्की आहे तरी कोण? पहिल्याच सिनेमातून बनली नॅशनल क्रश! By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 3:54 PM1 / 7किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' सिनेमा ऑस्कर शर्यतीत दाखल झाला आहे. ऑस्कर २०२५ साठी भारताकडून या सिनेमाची निवड झाली. इतर सर्व सिनेमांना मागे टाकत हा सिनेमा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.2 / 7अभिनेत्री प्रतिभा रांटाने सिनेमात 'जया'ची भूमिका साकारली. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने प्रेक्षकांवर छाप पाडली. यानंतर प्रतिभा संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजमध्येही दिसली. प्रतिभाची अभिनय क्षेत्रात नक्की कशी एन्ट्री झाली जाणून घेऊया. 3 / 7सिनेमाची कथा खूपच इंटरेस्टिंग असून यातील कलाकारांच्या साध्या सरळ अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांटा आणि नितांशी गोयल या नवोदित कलाकारांनी यात काम केलं आहे.4 / 7प्रतिभा २४ वर्षांची असून हिमाचल प्रदेशची आहे. सिमला जिल्ह्यातील टिक्कर हे तिचं गाव. तिने तिचं शिक्षण सिमला शहरात पूर्ण केलं. यानंतर प्रतिभाने मुंबईतीस उषा प्रवीण गांधी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमध्ये फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं.5 / 7प्रतिभाने २०२०-२१ साली 'कुर्बान हुआ' या टीव्ही मालिकेत काम केलं. ती मालिकेत मुख्य भूमिकेत होती मात्र कमी रेटिंगमुळे मालिका २०२१ मध्येच बंद झाली. यानंतर ती 'आधा इश्क' या मालिकेत झळकली. 6 / 7यानंतर तिला थेट २०२४ मध्ये 'लापता लेडीज' सिनेमा मिळाला. या सिनेमामुळे तिचं नशीबच फळफळलं. या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 7 / 7'लापता लेडीज' च्या रिलीजनंतर लगेच 'हीरामंडी' सीरिज आली. यात प्रतिभाने 'शमा'ही भूमिका साकारली. या दोन्ही प्रोजेक्टमुळे तिचं नाव सिनेसृष्टीत गाजत आहे. तिला यामुळे 'नॅशनल क्रश' हा टॅगही मिळाला. आणखी वाचा Subscribe to Notifications