'लापता लेडीज'मधील 'जया-दीपक' पडले प्रेमात... स्पर्श श्रीवास्तवला डेट करतेय प्रतिभा रांटा? By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 11:11 AM1 / 12बॉलिवूड स्टार्सच्या डेटिंग लाइफ आणि प्रेम प्रकरणांबद्दल मोठी चर्चा रंगते. अशीच एक चर्चा आता पुन्हा एकदा रंगली आहे. लापता लेडीज या चित्रपटात जया आणि दीपकची भूमिका साकारणारे प्रतिभा रांटा आणि स्पर्श श्रीवास्तव हे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे. 2 / 12अभिनेत्री प्रतिभा रांटा ही स्पर्श श्रीवास्तव डेट करत असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता या दोघांनी देखील यावर भाष्य केलं आहे. आपल्यामध्ये नेमकं काय नातं आहे यामागचं सत्य त्यांनी जगासमोर उघड केलं.3 / 12किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाचं सर्वत्र भरभरून कौतुक झालं. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'जया'ची भूमिका साकारणारी प्रतिभा रांटा आणि 'दीपक'ची भूमिका साकारणारा स्पर्श श्रीवास्तव हे लोकप्रिय झाले. 4 / 12चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रतिभा आणि स्पर्श नेहमीच एकत्र दिसले होते. दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग होतं, त्यानंतर त्यांच्या लिंकअपच्या बातम्या येऊ लागल्या. 5 / 12चाहत्यांना यामुळे अनेक प्रश्न पडले असून ते सतत त्यांना सत्य काय आहे? ते खरंच डेट करत आहेत का? असा सवाल विचारला आहे. चित्रपटाच्या यशानंतर हे दोघेही मुंबईतील नेटफ्लिक्स कार्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.6 / 12या प्रश्नाला उत्तर देताना प्रतिभा म्हणाली की, 'आम्ही डेट करतोय का? अजिबात नाही. यार... एक मुलगा आणि मुलगी खूप चांगले मित्र सुद्धा असू शकतात.'7 / 12एका चाहत्याने स्पर्शला विचारले की, तुझ्या आयुष्यातूनही लेडीज गायब आहे का? स्पर्श आधी यावर थोडा वेळ विचार करतो आणि मग म्हणतो, 'होय, खूप जास्त गायब आहेत आणि आता आयुष्यात एका नवीन लेडीची एंट्री होण्याची खूप गरज आहे.'8 / 12लापता लेडीज हा चित्रपट दोन विवाहित मुलींची कथा आहे ज्यांची स्वप्नं एकमेकींपेक्षा वेगळी आहेत. ट्रेनमध्ये दोन्ही नववधूंची अदलाबदली होते. घुंगटमुळे नेमकी आपली नवरी कोण हेच समजत नाही. 9 / 12अदलाबदलीनंतर दीपक आपल्या खऱ्या बायकोला नेमकं कसं शोधून काढतो. त्यादरम्यान कोणत्या घटना घडतात, कुटुंबीय कशी साथ देतात ते या चित्रपटात पाहायला मिळतं. 10 / 12लापता लेडीजमधील भूमिकेनंतर प्रतिभाला खूप नाव आणि प्रसिद्धी मिळाली. तिचे असंख्य चाहते असून ते तिच्या सौंदर्यावर घायाळ होतात. तर स्पर्श देखील अनेक चित्रपट तसेच टीव्ही शोमध्ये दिसला आहे.11 / 12प्रतिभा संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये दिसली आहे. या सीरिजमधील तिची भूमिका लोकांना खूप आवडली होती. ती संजीदा शेख यांची मुलगी 'शमा'च्या भूमिकेत दिसली होती. 12 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications