Join us

करिअरच्या सुरुवातीलाच सुपरहिट सिनमा देऊनही बॉलिवूडपासून दूर झाली अभिनेत्री ग्रेसी सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 10:40 AM

1 / 12
अजय देवगणसह 'गंगाजल' आणि संजय दत्तसह 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात ग्रेसीने काम केलं हे दोन्ही सिनेमा सुपरहिट ठरले होते.
2 / 12
सोबतच ग्रेसीने साकारलेल्या भूमिकाही तितक्याच हिट आणि लक्षवेधी ठरल्या.
3 / 12
याशिवाय तिने अनिल कपूर आणि प्रिती झिंटा स्टारर 'अरमान' या सिनेमात काम केलं होतं.
4 / 12
मात्र या निवडक सिनेमांनंतर ग्रेसीच्या सिने करिअरची गाडी रुळावरुन घसरली.
5 / 12
सिनेमाच्या ऑफर्सही येत होत्या, पण बोल्ड आणि इंटिमेट सीन्स करायला तिने नकार दिला होता.
6 / 12
२००७ मध्ये ग्रेसी तिच्या एक चूक केली आणि तीच चूक तिचे करिअर संपवण्यास कारणीभूतही ठरली.
7 / 12
सिनेमाची स्क्रिप्ट न वाचताच तिने 'देशद्रोही' सिनेमा करण्यास होकार दिला.
8 / 12
'देशद्रोही' सिनेमानंतर ग्रेसी कोणत्याच सिनेमात झळकली नाही.
9 / 12
करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला.
10 / 12
ग्रेसीसाठी छोट्या पडद्यावर काम करणं ही बाब काही नवी नव्हती.
11 / 12
१९९७ साली अमानत मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती.
12 / 12
या मालिकेत काम करत असतानाच तिने लगान सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट दिली आणि तिची लगानसाठी निवड झाली. यानंतर ग्रेसी सिनेमांमध्ये रमली.
टॅग्स :ग्रेसी सिंगआमिर खान