1 / 8''लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी'' असे म्हणत शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमकथेने थोड्याच दिवसांत प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली होती.2 / 8अज्या शीतली सोबत या मालिकेतील इतर पात्रांनाही रसिकांची खूप दाद मिळाली होती.3 / 8देशभक्तीने नुसतेच भारावून न जाता हाती तिरंगा घेऊन वीरगती पत्करणाऱ्या 'लागीरं झालं जी' मालिकेमधील 'फौजी विक्रम'च्या व्यक्तिरेखेला संपूर्ण महाराष्ट्राने प्रचंड लोकप्रियता दिली. 4 / 8फौजी विक्रम उर्फ विक्या उर्फ निखिल चव्हाण या गुणी कलावंताचा सुरु झालेला अभिनय क्षेत्रातील हा प्रवास त्याने साकारलेल्या भूमिके इतकाच रोमांचकारी आहे.नुकताच निखिल चव्हाण एका फोटोमुळे चर्चेत आला आहे. त्याचा हा फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.5 / 8निखिलने लागिर झालं जी मालिकेत जयडीच्या भूमिकेत घराघरात पोहचलेली अभिनेत्री पूर्वा शिंदेसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.6 / 8निखिलने पूर्वाचा फोटो शेअर करत लिहिले की, जवळची लांब जातात,लांबची जवळ येतात, पण काही आहे तिथंच असतात..... कायम!7 / 8निखिल व पूर्वाच्या या फोटोवर चाहते छान जोडी व लग्न कधी करणार असे विचारत आहेत. त्यामुळे निखिल व पूर्वा रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्या दोघांनी अद्याप याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही.8 / 8नाटक, मालिका, चित्रपट, वेबसिरीज असा चौफेर वावर असणाऱ्या निखिलने वीरगती, स्त्रीलिंग पुल्लिंग या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तसेच तो धोंडी चंप्या या चित्रपटात दिसणार आहे. तर पूर्वा शिंदे झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.