Lata Mangeshkar: लाडक्या आज्जीच्या आत्म्याच्या शांतीसाठी नातीची प्रार्थना! जनाईची लता दीदींना श्रद्धांजली By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 12:20 AM1 / 9आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला. रविवार, ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. (Lata Mangeshkar)2 / 9लता मंगेशकरांच्या जाण्याने संपूर्ण जगच स्तब्ध झाले. मंगेशकर कुटुंबीयांसाठीही या मोठा धक्का होता. आताच्या घडीला मंगेशकर कुटुंबीय कठीण काळातून जात आहे. यातच आता लता मंगेशकर यांच्या एका नातीने आज्जीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केल्याची माहिती मिळाली आहे.3 / 9मंगेशकर कुटुंबीयांप्रमाणे आशा भोसले यांचे कुटुंबही लता दीदींची खूप काळजी घेत असत. आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी आज्जी लता दीदी यांच्या निधनानंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी प्रार्थना केली. 4 / 9जनाई भोसले यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये जनाई भोसले एका शिव मंदिरात विशेष पूजन करताना दिसत आहे. महादेवावर दुग्धाभिषेक करताना या पोस्टमध्ये जनाई भोसले दिसत आहेत. 5 / 9जनाई भोसले यांनी दोन फोटो शेअर केले असून, या फोटोंना कॅप्शन देताना लता दीदींच्या आत्म्याला शांतता लाभावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. जनाई भोसले यांनी लता दीदींसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. 6 / 9दुसऱ्या फोटोमध्ये, हमको मिली है आज ये घडिया बहुत नसीब से, असे सांगत संगीत क्षेत्रातील प्रचंड योगदानासाठी अनंत आभार. आम्हाला खूप प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला अभिमान वाटेल, असे कार्य माझ्या हातून घडवण्याचा प्रयत्न करेन, असे जनाई भोसले यांनी म्हटले आहे. 7 / 9जनाई भोसले या आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांची कन्या आहेत. त्याही गायन क्षेत्रात करिअर करण्याची त्यांची इच्छा असून, त्यासाठी त्या तालीम घेत आहेत. जनाई भोसले या सचिन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांच्यात चांगली मैत्रीही आहे. 8 / 9दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असताना लता दीदी आपले वडील दीनानाथ मंगेशकर यांची गीते ऐकत होत्या, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे, लतादीदींच्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणी एक गोड हसू होते. गेल्या ३ वर्षांपासून लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. 9 / 9जेव्हा कधी लतादीदींची तब्येत बिघडायची तेव्हा मी त्यांच्यावर उपचार करायचो. मात्र यावेळी त्यांची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत गेली. आम्ही खूप प्रयत्न केले, पण शेवटी त्यांना वाचवू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रतीत समदानी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर व्यक्त केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications